आनंद राजगुरू यांचा प्रेरणादायी वाढदिवस...

नेहमी प्रमाणे आपण आपला वाढदिवस केक कापून किंवा सोशल मीडिया मधे स्टेटस ठेवून स्वतः ला स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो 
माझा मित्र आनंद राजगुरू याचा 26 मे रोजी वाढदिवस असतो सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आनंद ला कॉल केला तर तो वाढदिवस साजरा करण्यासाठी इन्फंट इंडिया , पाली, बीड या प्रकल्पाला भेट देण्यासाठी निघालोय अस त्याने सांगितल 

समाजाने नाकारलेल्या.... एचआयव्ही, एड्सग्रस्त आणि दगावलेल्या पालकांच्या पाल्याचे पालकत्व स्वीकारून, त्यांना एका तपापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांचं संगोपन शिक्षण आणि पुनर्वसन करत असलेले आदरणीय श्री दत्ताभाऊ बारगजे सर यांच्या सेवेतला सहवास त्याने एकट्याने नव्हे तर सहकुटुंब अनुभवला . आनंदवनातील काही सुखद क्षणाचे अनुभव कृतीतून देऊन त्याने आपल्या पुढील पिढीला देखील
" सेवेच्या संस्काराचा धडा " *देताना आपला वाढदिवस साजरा केला ....!!
फ्लेक्स बोर्ड लावून किंवा चौकात टू व्हीलर वर केक कापून गर्दी करताना फटाके फोडणाऱ्या व त्यातून समाज्याला त्रास होतोय याची जाणीव नसलेल्या तरुणांना आनंद राजगुरू यांनी स्वत: चा वाढदिवस कसा साजरा करावा याचा हा प्रसंग म्हणजे कृतिशील दाखला आहे , माझा मित्र युवा उद्योजक आनंद राजगुरू यांचा आदर्श आपण सगळ्यांनी नक्की घेतला पाहिजे अस मला वाटत.
खर तर पूर्वनियोजित कामामुळे मला या आनंदी क्षणाचा साक्षीदार होता आले नाही याची खंत मनाला वाटत आहे जी पुढील काळात भरून काढण्याचा प्रयत्न राहील , पुन्हा एकदा एक आदर्श उपक्रम राबवल्या बद्दल श्री आनंद राजगुरू व त्याचे कुटुंबीय यांचे मनपूर्वक अभिनंदन.

पुन्हा एकदा आनंद राजगुरू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शुभेच्छुक 
श्री विनायक विठ्ठलराव राऊत
गोरोबा सिनेमा, जामखेड

Post a Comment

Previous Post Next Post