श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या गाडीचा अपघात

श्रीक्षेत्र गहिनीनाथ (चिंचोली ता.पाटोदा )गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा आज (ता.२२) वार बुधवार रोजी सकाळी ११. वाजेच्या दरम्यान अपघात झाला आहे.

याबत सविस्तर माहिती अशी की,विठ्ठल महाराज हे त्यांच्या गाडीने गहिनीनाथ गडावरून पाथर्डी कडे जात असतांना चिंचपूर इजदे ते करोडी दरम्यान धोकादायक नागमोडी वळण असलेल्या ठिकाणी गाडीचे टायर फुटले व त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली यामध्ये विठ्ठल महाराज शाश्री हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला तसेच छातीला गंभीर ईजा झाली असल्याची माहिती समजली आहे.दरम्यान अपघातानंतर त्यांना तात्काळ पाथर्डी येथील युनिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते .तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील अधिक उपचारासाठी अहिल्यानगर येथील साईदीप रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत माहिती समजताच भक्तांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली होती.

Post a Comment

Previous Post Next Post