सर्वांच्या सहकार्य यामुळे तालूक्यात चांगले काम करता आले- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे





गटशिक्षणाधिकारी पदावरून बाळासाहेब धनवे यांची उपशिक्षणाधिकारी या पदावर नियुक्ती 

जामखेड प्रतिनिधी - तालूक्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी , साधन व्यक्ति , विषयतज्ञ या सर्वांनी अतिषय मेहनत घेऊन तालूक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले तसेच सर्व शिक्षक संघटना यांनी चांगल्या कामाला साथ दिली त्यामुळेच मला कमी कालावधीत चांगले काम करता आले असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केले. त्यांची गटशिक्षणाधिकारी पदावरून उपशिक्षणाधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यामुळे सर्व शिक्षक संघटना व समन्वय समितीच्या वतीने निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी शिक्षक नेते एकनाथ चव्हाण, अनिल आष्टेकर, मुकुंदराज सातपुते, संतोषकुमार राऊत, गोकुळ गायकवाड, केशवराज कोल्हे, प्रताप पवार आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
  यावेळी त्यांनी बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवले.त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.प्रत्येक शिक्षकाला प्रेरणा व प्रोत्साहन देऊन चांगल्या कामाचे वर्तमान पत्रात प्रसिद्ध देऊन यामुळे शिक्षकांची समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली.शिक्षकांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा निर्माण झाली.नवोदय परिक्षा,स्काॅलरशिप परिक्षा , विविध गुणदर्शन स्पर्धा यांमध्ये जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.कोणत्याही शिक्षकांवर कारवाई केली नाही.असे गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्याला पुन्हा मिळणे नाही.अशा भावना व्यक्त केल्या.सर्व शिक्षकांनी धनवे यांची शिक्षणाधिकारी  पदांवर पदोन्नती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
   यावेळी संचालक संतोष कुमार राऊत ,विश्वस्त मुकुंदराज सातपुते, एकनाथ चव्हाण ,केशवराज कोल्हे अनिल आष्टेकर, अर्जुन पवार,प्रताप पवार, किशोर राठोड, विनोद सोनवणे, किरण माने, मनोज कुमार कांबळे ,भगवान समुद्र, तात्या घुमरे, रामहरी बांगर, मारुती गीते, भाऊसाहेब डिडूळ, संभाजी तुपेरे ,सचिन पवार, नितेश महानवर , राजीव मडके,शिवाजी हजारे, बाळासाहेब जरांडे ,पांडुरंग मोहोळकर, गणेश नेटके, संतोष लगड, शकील बागवान, अविनाश नवसरे ,बाळासाहेब गांगर्डे, माजिद शेख, सुभाष नेटके, मुकुंद ढवळे ,संतोष मुरूमकर, दिगंबर माने, संतोष कुऱ्हे, संतोष उगले ,गंगाराम घायतडक आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश नेटके व आभार प्रदर्शन संभाजी तुपेरे यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post