राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी नगरच्या सलोनी प्रसाद ची निवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगरच्या सलोनी उमेश प्रसाद ने सुवर्णपदक जिंकून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्राचे दहा मुले व दहा मुली पुणे इथून आज विशाखापट्टमच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई व चंद्रपूर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने 19 ते 21 जुलै 2024 दरम्यान महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील नगरच्या सलोनी प्रसाद ने सुवर्णपदक, अहमदनगरची ज्ञानेश्वरी रोडे कांस्यपदक व कोल्हार च्या युगम नहारने कांस्यपदक जिंकले तर खुल्या स्पर्धेत साईशा राहुल बेंद्रे श्रवणी रानसिंग, वैष्णवी राठोड या तिघांनी सुवर्णपदके सार्थक निमसे रौप्यपदक तर अंचल गुगळे ने कांस्यपदक पटकावले या सर्व खेळाडूंना टीम कोच सुरेश वाघ, गणेश धिवर, रवी यादव, दिनेशसिंह राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने 
विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा होत आहेत या स्पर्धेत निवड झालेल्या सलोनी प्रसाद हिला
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा सतिश खेमसकर दुलिचंद मेश्राम तसि अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सहसचिव अलताफ कडकाले, शकील सय्यद अंबादास साठे बाबासाहेब क्षिरसागर, लक्ष्मण शिंदे, महेश मुरादे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप, संतोष परांडे, सचिन आगळे, प्रभाकर शेळके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post