पुमसे प्रकारात मुंबई उपनगराला विजेतेपद
यजमान बीडच्या खेळाडूंना ४ रौप्यपदके
बीड - तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड या संघटनेचे क्रीडा क्षेत्रात फार मोठे योगदान असून डॉ. अविनाश बारगजे यांनी या खेळासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. येणाऱ्या काळात जिल्हा संघटनेला सहकार्य करू असे प्रतिपादन डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी केले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण , जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितिन कोटेचा, डॉ. ईलीयस खान, अॅड शफिक शेख, समाज कल्याण अधिकारी प्रमोद सानप, शासनाचे स्पर्धा निरीक्षक क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, सतिश खेमसकर, नीरज बोरसे आदी उपस्थितीत होते. क्योरोगी प्रकारात पुणे संघाने १४ सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, रत्नागिरी संघाने ३ सुवर्णपदके जिंकून स्पर्धेचे उपविजेतेपद तर मुंबई उपनगर संघाने स्पर्धेचे तिसरे स्थान पटकावले. पुमसे प्रकारात मुंबई उपनगर संघाने ३ सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रायगड संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद तर पालघर संघाने स्पर्धेचे तिसरे स्थान पटकावले. यजमान बीड खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी नोंदवत ४ रौप्यपदके आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध वजन गटातील अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व दोन कांस्यपदके विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे-
मुले 45 किलो - सुवर्णपदक प्रथमेश माकनर अमरावती, रौप्यपदक सार्थक भाकरे बीड, कांस्यपदक सुजल पाटील मुंबई उपनगर, कांस्यपदक पार्थ पांडे कोल्हापूर
48 किलो - सुवर्णपदक ओम बोरसे पुणे, रौप्यपदक सार्थक चव्हाण रत्नागिरी, कांस्यपदक आयुष सकपाल मुंबई, कांस्यपदक सिद्धार्थ हजारे कोल्हापूर
51 किलो -सुवर्णपदक यश टेकम अमरावती, रौप्यपदक अशिश फाळके मुंबई , कांस्यपदक श्रीकृष्ण गोपाळघरे पुणे , कांस्यपदक प्रणव चौघुले कोल्हापूर
55 किलो वजन गट- सुवर्णपदक आर्यन राऊत पुणे, रौप्यपदक कृष्णराज कदम मुंबई उपनगर,कांस्यपदक प्रांतीक जमगाडे नागपूर, कांस्यपदक शिवम शहाणी छत्रपती संभाजीनगर
59 किलो वजन गट- सुवर्णपदक अश्वेत जाधव पुणे, रौप्यपदक लोकेश महाजन जळगाव, कांस्यपदक प्रथम भांडारकर गोंदिया,कांस्यपदक सत्यजीत गोणुगडे कोल्हापूर
63 किलो वजन गट - सुवर्णपदक विश्वजीत वेंगाडे पुणे, रौप्यपदक ओमकार परदेशी बीड, कांस्यपदक अभिषेक पांडव कोल्हापूर,कांस्यपदक निशांत काळे नागपूर
68 किलो -सुवर्णपदक अनिरुद्ध वाघमारे पुणे ,रौप्यपदक ऋषिकेश बेडसे ठाणे,कांस्यपदक देवराज देवधर कोल्हापूर,कांस्यपदक समर्थ सकपाळ रत्नागिरी
73 किलो वजन गट - सुवर्णपदक अर्णव चव्हाण पुणे, रौप्यपदक युवराज लवटे सांगली, कांस्यपदक प्रणव पोतदार कोल्हापूर, कांस्यपदक मुजम्मील खान अकोले
78 किलो आतील - सुवर्णपदक प्रथम केशवाणी ठाणे, रौप्यपदक रितेश दाभाडे छत्रपती संभाजीनगर, कांस्यपदक रुद्राक्ष गोलार नागपूर, कांस्यपदक गोविंददेव फुले पुणे
78 किलो वरील- सुवर्णपदक शिवांक भारद्वाज पुणे,रौप्यपदक अरित्रा मोझा ठाणे, कांस्यपदक ओम बारगजे अहमदनगर,कांस्यपदक ओम अपराज रत्नागिरी
मुली 42 किलो -सुवर्णपदक रिया मयेकर रत्नागिरी ,रौप्यपदक यशस्वी चव्हाण बीड, कांस्यपदक प्रगती स्वामी पुणे, कांस्यपदक मृदुला होसुर कोल्हापूर
44 किलो मुली - सुवर्णपदक त्रिशा मयेकर रत्नागिरी, रौप्यपदक अनुजा घरल कोल्हापूर,कांस्यपदक समृद्धी यादव ठाणे,कांस्यपदक अनुश्री राठोड धाराशिव
46 किलो मुली - सुवर्णपदक तनिष्का काळे पुणे ,रौप्यपदक वैष्णवी पाटील कोल्हापूर, कांस्यपदक अर्पिता रामटेके चंद्रपूर,कांस्यपदक वैष्णवी पाटील रत्नागिरी
49 किलो वजन गट - सुवर्णपदक राधा वाघमारे पुणे, रौप्यपदक प्रियंका धर्मे कोल्हापूर,कांस्यपदक शेषा जयस्वाल नागपूर,कांस्यपदक गार्गी म्हस्के मुंबई
52 किलो मुली - सुवर्णपदक मयुरी गावडे पुणे, रौप्यपदक निकिता पवार जळगाव,कांस्यपदक श्रुती कौसाले बीड, कांस्यपदक तनया शेळके छत्रपती संभाजीनगर
55 किलो मुली - सुवर्णपदक वेदश्री गावडे पुणे, रौप्यपदक नूतन पुंड अमरावती , कांस्यपदक प्रज्योती जाधव सिंधुदुर्ग, कांस्यपदक अश्रीया वस्त मुंबई
59 किलो मुली- सुवर्णपदक तनुश्री नारकर रत्नागिरी, रौप्यपदक श्रद्धा वाल्हेकर पुणे,कांस्यपदक मानसी डोळस अहमदनगर, कांस्यपदक मयुरी साळुंखे मुंबई
63 किलो मुली - सुवर्णपदक नॅन्सी सिंग पुणे, रौप्यपदक विधी गोरे रत्नागिरी, कांस्यपदक तंझीला अख्तर नंदुरबार, कांस्यपदक स्नेहा वाघमारे कोल्हापूर
68 किलो आतील मुली - सुवर्णपदक सिद्धी बेंडाळे पुणे, रौप्यपदक दिती सातोपे मुंबई उपनगर, कांस्यपदक अनुष्का काळे चंद्रपूर, कांस्यपदक संस्कृती नागे अकोला
68 किलो वरील मुली - सुवर्णपदक आर्या शिंदे पुणे, रौप्यपदक आर्या ओटवकर ठाणे,कांस्यपदक सुहानी धनल कोल्हापूर, कांस्यपदक आदिती राहटे मुंबई
यावेळी स्पर्धेला सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, नगरसेवक शुभम धुत , शुभम कातांगळे, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री खोड सर, मुख्याध्यापक सचिन पवार ,प्राचार्य देवेंद्र भाकरे ,आयोजन समितिचे अध्यक्ष नितिन कोटेचा , क्रीडा अधिकारी अनिकेत काळे व धनेश करांडे यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश बारगजे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शकील शेख, डॉ. विनोदचंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दिनकर चौरे, ॲड सोमीनाथ मिसाळ, अविनाश पांचाळ, नवीद शेख, डॉ. शकील शेख
अलताफ कडकाले, सचिन जायभाये, नितीन आंधळे, बन्सी राऊत, कृष्णा उगलमुगले, ऋत्विक तांदळे, मयुरेश तिवारी, ॲड महेंद्र गंडले, अनिस शेख, पारस गुरुकुदे ,देवेंद्र जोशी, रंजीत काकडे, सुदर्शन गायकवाड, तानाजी आगळे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
Tags
तायक्वांदो