महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट पासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दुपारी दोन वाजता विना पूजन करून सप्ताहस प्रारंभ होईल. दुपारी 4 ते 5.30 वा.
संत गोरोबा काकांचे श्रीक्षेत्र तेर येथील सकल संत चरित्रकथा निरुपणकार ह.भ.प. श्री. दिपकजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून पसायदान भावार्थ निरुपण होईल.
'शिवलीलामृत पारायण'
यावर्षी, श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी होत आहे व श्रावण महिन्याचा शेवटही सोमवारीच होत आहे. हा, योग 27 जुलै 1953 साली आला होता. त्यानंतर यावर्षी तब्बल बहात्तर वर्षांनी हा योग येत आहे. या तिथीचे औचित्य साधून अमावस्येला सुरू होणारे 'शिवलीलामृत' पारायण रविवार ऐवजी श्रावण शुद्ध प्रतिपदा वार सोमवार सकाळी साडे आठ ते दहा या वेळेत होणार आहे.
सप्ताहा निमित्त दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8:30 ते 10 शिवलीलामृत पारायण 10 ते 12 वा. गाथा भजन, दुपारी 4 ते 5.30 वा. पसायदान भावार्थ निरुपण, 5.30 ते 6.30 वा. सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी 7 ते 9 श्री क्षेत्र सिताराम गड खर्डा येथील मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांचे कीर्तन होईल. सोमवारी ज्ञानेश्वर महाराज घोडके श्रीगोंदा, मंगळवारी, 'अखिल भारतीय वारकरी मंडळाचे,'अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, बुधवारी चेतन महाराज बोरसे मालेगाव, गुरुवारी रामकृष्ण महाराज रंधवे पाटोदा, शुक्रवारी संदीप महाराज येवले नाशिक, शनिवारी अशोक महाराज हुंबे, आळंदी. यांची कीर्तने होतील. रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगत होईल.