संजय कोठारींचे सामाजिक काम पाहण्यासाठी जामखेड आलो - सतीश मगर



जामखेड प्रतिनिधी : जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सामाजिक कार्याची खरोखर सर्वांनी दरवल घेतली पाहीजे आणि त्यांच्या या कार्याचा बोलबाला ऐकुनच मी जामखेडला आलो असल्याचे स्पष्टीकरण सतीष मगर यांनी दिले. कोठारी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

 क्रीडा संघटना भारताचे अध्यक्ष आणि मगरपट्टा सिटी चे सर्वेसर्वा आणि पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर  सतीश मगर यांनी जामखेड येथे कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आणि जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांची भेट घेतली यावेळी कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. 

 यावेळी  बोलताना सतीष मगर यांनी संजय कोठारी यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली
सतीश मगर म्हणाले संजय कोठारी यांच्या सारखे काम मी अद्याप पाहिले नाही खरोखरच त्यांचे कार्य हे वाखांन्याजोगे आहे खर तर पाच वर्षात जामखेडला येण्याची माझी
 ही  दुसरी वेळ आहे. कोठारी साहेबांचे उत्कृष्ट नियोजन आणि कामाची पद्धत खूप चांगली आहे. विशेषता म्हणजे अपघातातील हजारो लोकांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. कोरोना  काळात ते घरात न बसता त्यांनी गरिबांची आणि अडचणीतल्या लोकांची त्यांनी मदत आणि सेवा  केली. अशा अनेक गोष्टी त्यांच्या हातून घडत आहेत. 
कोठारी यांनी आज आमचा  सन्मान केला आणि आम्ही फोन करून त्यांचा वेळ घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी आमच्याबरोबर बैठक घेतली तसेच माझ्याबरोबर आमचे पुणे येथील मित्र राजेंद्र बोरा  आणि योगेश सुपेकर अहमदनगर , राजेंद्र मुणोत बीड यांचा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सत्कार केला 

 राजेंद्र बोरा पुणे यांच्याकडून आम्हाला सतत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या समाजकार्याची माहिती मिळत असते. यावेळी बोलताना सतीश मगर म्हणाले माझे जावई रोहित पवार हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून या मतदार संघातून निवडून आले  आहेत त्यांचे कार्य सर्व जामखेड करतांना माहीतच आहे 
तसेच तुमच्या जामखेड करांच्या काही अडी अडचणी असल्यास मी त्यांच्या माध्यमातुन सोडवण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी यावेळी सांगितले 
यावेळी कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, उद्योजक कांतीलाल कोठारी, राजेंद्र मूनोत बीड, भारतीय जैन संघटना जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल  सोळंकी,सुनील जगताप, मार्केट यार्ड चे सुभाष भंडारी, बजरंग डोके, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल तातेड, साखर सम्राट अशोक चोरडिया, मेडिकल असोसिएशनचे सुभाष भळगट, मयूर भोसले ,धनंजय भोसले, योगेश पवार ,हर्षल कोठारी ,रोहन कोठारी , प्रदीप शेटे, अमोल लोहकरे, प्रकाश काळे,मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुनील उगले आदी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post