महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस च्या रूपाने मुख्यमंत्री मिळणार आहे. निवडणूकीच्या काही महिन्यांपूर्वी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी केली होती. त्यांची ती भविष्यवाणी आज प्रत्यक्षात खरी ठरली आहे. आणि याबाबत आज सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
संत वामनभाऊ महाराज यांच्या गादीवर विराजमान असलेले महंत श्री विठ्ठल महाराज यांचेही शब्द खरे होतात ही प्रचिती या वेळेला आलेली दिसत आहे. संत वामनभाऊ महाराज हयात असताना त्यांचे वचन अनेक वेळेला खरे ठरले. अर्थात त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होती अशी मान्यता आहे. परंतु त्यांच्यानंतर म्हणजे त्यांच्या गादीवर असणारे महंत वै. गोरक्षनाथ महाराज व सध्याचे महंत श्री विठ्ठल महाराज यांचेही शब्द अनेक वेळा खरे ठरतात. याचाही प्रत्यय अनेक वेळेला आलेला असल्याचे समाजात नेहमी बोलले जाते.
साधारण सप्टेंबर महिन्यात एका काल्याच्या कीर्तनात श्री विठ्ठल महाराज यांनी महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरही श्रीक्षेत्र गहिनीनाथ येथे महाराजांनी या बाबत पुनरुच्चार करून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि तसेच झाल्यास श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा आणखीन विकास होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता.
23 तारखेला निकाल लागल्यानंतर भाजपला सर्वात जास्त जागा असल्यामुळे व भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले असताना देखील मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरीत होता. अजित पवार गट व शिंदे गटाने भाजपचा मुख्यमंत्री करण्यास सहमती दिली असताना देखील भाजपकडून मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर होण्यास बराच कालावधी लागला. परंतु बुधवारी सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाले व त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. आज आझाद मैदान मुंबई येथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अन्य मंत्री देखील शपथ घेतील यावेळी अनेक साधुसंतांनाही निमंत्रित केले आहे. यावेळी महंत विठ्ठल महाराज यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. व या शपथ ग्रहण समारोह प्रसंगी श्री. विठ्ठल महाराज मुंबईत दाखल झाले आहेत.
वरील सर्व घटनाक्रम पाहता श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती अर्थात श्री संत वामनभाऊ महाराज यांचे तर्फे उत्तर अधिकारी असेल मानतो श्री विठ्ठल महाराज यांनी निवडणुकीपूर्वी सहा महिने जो जी भविष्यवाणी केली होती ती आज खरी होताना दिसत आहे वसंत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचा विकास करतील अशी भक्तांना अशा आहे.