जामखेड प्रतिनिधी
'चांगले साथीदार लाभणे याला भाग्य लागते आम्हाला बाबासाहेब शेकडे साहेब यांची चांगली साथ लाभली त्यांनी ३२ वर्ष धर्मदाय आयुक्त कार्यालयात सेवा केली संपूर्ण आयुष्यात कसलाही डाग लागू दिला नाही. ते निष्कलंक राहिले त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. 'असे प्रतिपादन अहिल्यानगरचे धर्मदाय उप आयुक्त एन. व्ही. जगताप यांनी केले
धर्मदाय उप आयुक्त कार्यालय अहिल्यानगरचे अधीक्षक बाबासाहेब हिराजी शेकडे सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने रविवारी त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे धर्मदाय सह आयुक्त एम. एल. जोगी होते. अहिल्यानगरचे धर्मदाय उप आयुक्त एन. व्ही. जगताप, छत्रपती संभाजीनगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील, बीड जिल्हा शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते, आकोला जिल्ह्याचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश विनोद डोंगरे, ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगरच्या सदस्य श्रीमती चारु विनोद डोंगरे, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमंत थोरवे सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी हेमंत पोखरणा कैलास शेवाळे डॉ. उमेश गांधी, सोपानराव शेकडे उपस्थित होते. यावेळी धर्मदाय उप आयुक्त कार्यालय अहिल्यानगरचे अधीक्षक बाबासाहेब हिराजी शेकडे व त्यांच्या पत्नी संगीता बाबासाहेब शेकडे यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तत्पूर्वी या निमित्ताने श्री शेकडे यांच्या आई वडिलांच्या विशेष प्रतिमांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अहिल्यानगरचे धर्मदाय उप आयुक्त एन. व्ही. जगताप म्हणाले शेकडे साहेब यांनी 32 वर्ष धर्मदाय आयुक्त कार्यालयात सेवा केली मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर बीड या विविध ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी संपूर्ण आयुष्यात कसलाही डाग लागू दिला नाही ते निष्कलंक राहिले त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही त्यांच्या अनुभवाचा आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना कायम फायदाच झाला. पुणे येथे असताना त्यांच्याकडे धर्मादायचा वैद्यकीय विभाग होता त्या काळात त्यांनी असंख्य गरजू व्यक्तींची योग्य सेवा केली. त्यांचे बोलणे हे खरे आणि वागणे ही खरे आहे त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांच्या सारखे साथीदार मिळाले चांगले साथीदार लाभणे याला भाग्य लागते'
यावेळी नाशिकचे धर्मदाय सह आयुक्त एम. एल. जोगी म्हणाले " मी आणि श्री शेकडे मागील काही वर्षे बीड येथील धर्माधिकारी उप कार्यालयात काम करत असताना मला त्यांच्या अनुभवाचा नेहमी फायदा झाला त्यांना शेतीची फार आवड आहे शेतीमुळे ते गावाकडे राहायचे परंतु आमच्या सर्वांच्या अगोदर कार्यालयात हजर असायचे व सर्व कामे आटोपल्यानंतरच ते कार्यालय सोडायचे. खरे तर त्यांना धर्मदाय सहाय्यक आयुक्त पदी काम करण्याची संधी मिळायला हवी होती. परंतु परीक्षा उशिरा झाल्यामुळे ही संधी हुकली. तरी देखील ते आमच्यासाठी सहाय्यक आयुक्तच होते व त्याच पदावरून ते आज सेवानिवृत्त झाले असे आम्ही समजतो. खरे तर आम्ही सर्वजण 'public servant' आहोत अर्थात 'लोकसेवक' आहोत शेकडे साहेब यांनी लोकसेवक या नावाला शोभेल अशी समाजाची सेवा केली. असे म्हणून त्यांनी श्री शेकडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते म्हणाले
'बाबासाहेब शेकडे यांच्या अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना झाला. आमच्यापैकी ते पहिले अधिकारी. मी ज्या वेळेला एम पी एस सी परीक्षा पास झालो त्यावेळी मुलाखत देताना मला शेकडे साहेब यांनी विशेष मार्गदर्शन केले व मी अधिकारी झालो. आजही मी त्यांच्या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करतो'
यावेळी संजय कोठारी दिवाणी न्यायाधीश विनोद डोंगरे सोपानराव शेकडे यांची भाषणे झाली यावेळी अहिल्यानगर धर्मादाय वकील संघटना, बीड धर्मादाय अधिकारी कार्यालय वकील संघटनेच्या वतीने तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री शेकडे यांचा सपत्नीक सत्कार केला.
तसेच यावेळी मान्यवरांचा अमित शेकडे, ऍड. महेश वारे, संदीप ठोंबरे, संगीताताई शेकडे यांनी सत्कार केला.
हनुमंत निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सत्कारमूर्ती बाबासाहेब शेकडे यांनी उपस्थितांचे आमचे आभार मानले.
जाहिरात 👇