श्रीनागेश्वर सप्ताहास आज प्रारंभ, शिवलीलामृत पारायण उद्यापासून सुरू



    जामखेड : श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार पासून सप्ताहस प्रारंभ होईल. शिवलीलामृत पारायण शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू होईल. तर श्री नागेश्वर पालखी सोहळा नागपंचमी च्या दिवशी २९ जुलै रोजी होईल.

विणापूजन
    श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास आज दिनांक २४ जुलै पासून प्रारंभ होत आहे. 
 दुपारी ३ वाजता परिसरातील सर्व भक्तांच्या उपस्थितीत जामखेडचे तहसीलदार मा. श्री. गणेश माळी साहेब यांच्या शुभहस्ते  करून सप्ताहास प्रारंभ होईल.

शिवलीलामृत पारायण
    सप्ताहास दुपारनंतर प्रारंभ होणार असल्यामुळे पहिल्या दिवशी शिवलीलामृत पारायण होणार नाही त्या ऐवजी शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता पारायण सुरू होईल. ह.भ.प. पंढरीनाथ महाराज राजगुरू व्यासपीठ चालक असतील. 

    सप्ताहा निमित्त दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8:30 ते 10 शिवलीलामृत पारायण 10 ते 12 वा. गाथा भजन, दुपारी 4. ३० ते 5.30 वा.  प्रवचन , 5.30 ते 6.30 वा. सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

 रोज सायंकाळी 7 ते 9 किर्तन सेवा 

२४ जुलै ह.भ.प.श्री. विजय महाराज बागडे, जामखेड 

२५ जुलै  ह.भ.प.श्री. गोविंद महाराज जाटदेवळेकर 

२६ जुलै  ह.भ.प.श्री. विक्रांत महाराज पोंडेकर, कल्याण

२७ जुलै ह.भ.प.श्री. उल्हास महाराज सूर्यवंशी, 
विश्वस्त अध्यापक - सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी

२८ जुलै ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज जायभाये, अध्यापक सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी

२९ जुलै ह.भ.प. श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर ,जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज 

 ३० जुलै ह. भ. प. श्री. चेतन महाराज बोरसे मालेगाव. 

    गुरुवार  दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह. भ. प. श्री. चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगत होईल. 

श्रीनागेश्वर पालखी सोहळा
     मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. परीसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील. 

    या संपूर्ण उत्सवाची तयारी झाली असून श्री नागेश्वर सेवा मंडळ व भक्त मंडळातील सर्व भक्त व सप्ताह समितीतील सर्व सदस्य हा उत्सव साजरा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

    तरी वरील कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी व शिवलीलामृत पारायणासाठी इच्छुक असणाऱ्या वाचकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीनागेश्वर सेवा भक्त मंडळ व सप्ताह समिती जामखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post