शिवलीलामृत पारायणास वाचकांचा उस्फुर्त सहभाग, आज परमेश्वर महाराज जायभाये यांचे किर्तन

श्रीनागेश्वर यात्रा उत्सव  


जामखेड ( प्रतिनिधी ) :- 
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'शिवलीलामृत' पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पारायणाची सुरुवात झाली. यामध्ये वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा मंगळवारी सकाळी होणार आहे. आज रविवारी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्त परमेश्वर महाराज जायभाये यांचे किर्तन होईल. 

शिवलीलामृत पारायणामघ्ये १५१ वाचकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. ह.भ.प. श्री. पंढरीनाथ महाराज राजगुरू हे या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक आहेत. दररोज भल्या पहाटे काकडा आरती होते सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले जाते. दररोज सकाळी ग्रंथ पूजन १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्र जप, महादेवाचा अभंग गायला जातो, नंतर अध्यायातील ओव्या वाचन व शेवटी महादेवाच्या आरतीने रोजच्या पारायणाची सांगता होते. त्यानंतर लगेच गाथा भजन होते. 
यामुळे मंदिर परिसरातील वातावरण सकाळी अतिशय प्रसन्न वाटते. 

विजय महाराज बागडे, जामखेड, गोविंद महाराज जाटदेवळेकर, विक्रांत महाराज पोंडेकर कल्याण
यांची कीर्तने झाली तर आज २७ जुलै रोजी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्त परमेश्वर महाराज जायभाये यांचे किर्तन होईल. 

२८ जुलै रोजी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्त तथा अध्यापक - 
उल्हास महाराज सूर्यवंशी
२९ जुलै जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज देहुकर 
३० जुलै चेतन महाराज बोरसे मालेगाव. यांची सायंकाळी सात ते नऊ या वेळेत किर्तने होतील. 
गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

श्रीनागेश्वर सप्ताहातील पहाटेची काकडा भजन सेवा
सर्वश्री ह.भ.प. रावसाहेब कोल्हे नाना, दादा महाराज आजबे, हरिभाऊ महाराज जठार, श्रीराम नेटके, हिरालाल नेटके आण्णा व  संतोष बारगजे

Post a Comment

Previous Post Next Post