शालेय तायक्वांदो स्पर्धा जामखेडला उत्साहात

जामखेड प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यात पावसाळी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला असून तायक्वांदो या खेळाच्या तालुकास्तरीय शालेय स्पर्धा ल. ना. होशिंग विद्यालय येथे उत्साहात पार पडल्या. 

अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी संतोष वाबळे, तालुका क्रीडा अधिकारी  प्रियंका खिंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा प्रमुख प्रल्हाद साळुंके यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. 
द पीपल एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड येथे २० ऑगस्ट २०२५ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यालयाचे प्राचार्य बी.ए. पारखे उपप्राचार्य वाय. डी. भोसले नागेश विद्यालयाचे स्थानिक समिती सदस्य विनायक राऊत, 
शिक्षक प्रतिनिधी पांडुरंग वराट तसेच क्रीडा शिक्षक राघवेन्द्र  धनलगडे,  कन्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुग्रीव ठाकरे सर, नागेश विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आबासाहेब जायगुडे, एडवोकेट महेश वारे, पाटील सर , जरे सर, पोदार शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन अळकुटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. अ. नगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे, गायत्री बारगजे यांनी पंच म्हणून काम पाहिले. 

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी कन्या विद्यालयाच्या तेजश्री सांगळे, प्राची माने, गायत्री येवले, सानिका नागरगोजे, वैष्णवी दळवी, शर्वरी डुचे, श्रद्धा नलवडे या खेळाडूंची निवड झालेली आहे. 

मुलांमध्ये ल. ना. होशिंग विद्यालयाचे मु. साद शेख, मयूर शिरगरे ,पृथ्वीराज पंडित, तर श्री नागेश विद्यालयाचे सोहम अंदुरे , कृष्णा पोले, आदर्श समिंदर, धनंजय शिरगरे, समाधान सदाफुले, श्रेयश वराट, मुलानी रेहमान,  शिवम राळेभात यांचा समावेश आहे. 
कालिका पोदार लर्न स्कूलचे श्लोक वारे, शिवानी पोटे, अन्वेशा कोकाटे यांची निवड झाली आहे. तर
श्री. आणखेरी देवी विद्यालयाचा विजय जायभाय याची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

सर्व यशस्वी खेळाडूंचे श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके सर, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बी.ए. पारखे सर, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिणी भोर, पोदार शाळेचे प्राचार्य कुंदन नेमाडे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post