राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी जामखेड च्या ओम ठोंबरे व शिवतेज येवलेची निवड

जामखेड प्रतिनिधी
जामखेड च्या जगदंबा मंगल कार्यालयात येथे झालेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत जामखेडच्या दोन खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले आहे.  सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली. 

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग येथे ते 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान 35 व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा होणार आहे. या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने जगदंबा मंगल कार्यालय खर्डा रोड जामखेड येथे रविवारी  अहिल्यानगर जिल्हा सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. 41 किलो वजन गटात ओम संदीप ठोंबरे,  व 50 किलो वजन गटात शिवतेज योगेश येवले, या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

तसेच ओम येवले याने कांस्यपदक जिंकले आहे हे सर्व खेळाडू अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या श्री नागेश विद्यालय जामखेड येथील प्रशिक्षण केंद्रात जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांच्याकडे नियमित सराव करतात. 

वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष अलताफ कडकाले, कोषाध्यक्ष किरण बांगर, संत गोरोबा काका पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक राऊत, संजय बेरड, आनंद राजगुरू, दत्तात्रय उदारे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post