प्रतिनिधी जामखेड
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखाबाई सुभाषलाल कोठारी यांचे दि १५रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व दोन मुली (विवाहित) सुना नातवंडे असा परिवार आहे.
जामखेड येथील तपनेश्वर आमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेखाबाई कोठारी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या सतत साधुसंतांची सेवा मनोभावे करत असत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. अंतविधी प्रसंगी जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. तसेच
विजय मुथा रायचूर, गौतम भन्साली, शिरीष दुगड, संजय रायसोनी, डॉ. सुवालाल छाजेड, कांतीलाल छाजेड, महावीर छाजेड, गौतम छाजेड, डॉ. राहुल छाजेड, ताराचंद कटारिया, दीपक लोणकर, एडवोकेट सुमतीलाल बलदोटा, विजय रायसोनी, राहुल शिंगवी, विजयराज बंब, अनिल पिपाडा, नरेंद्र पिपाडा, जीवन समदडीया, डॉ. राजेंद्र पिपाडा, प्रकाश देसरडा, राहुल सोनी मंडलेचा, डॉ. पारस बोरा, प्रकाश बोरा, मुकेश बोरा, सुनील बोरा, अशोक बोरा, एडवोकेट अशोक कोठारी, डॉ. रमेश कोठारी, सुमतीलाल कोठारी, कांतीलाल कोठारी, अनिल कोठारी, आनंद कोठारी, अमित कोठारी,
भाजपाचे नेते मधुकर राळेभात दैनिक लोकाशाचे संपादक विजय बंब, राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, सुर्यकांत मोरे, अमित चिंतामणी ,पांडुरंग सोले ,शहाजी राळेभात ,लक्ष्मण भोरे, डॉ कैलास हजारे, आदी यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाचे म्हणजे पुणे येथे डॉक्टर गौतम छाजेड यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर गौतम छाजेड व त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा छाजेड यांनी यांच्या टीमसह खूप सेवा केली.