जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे निदर्शने


    जामखेड 
    राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस जामखेडमध्ये दाखल होताच, त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आक्रमक विरोधाला सामोरे जावे लागले. फडणवीस यांच्या ताफ्यासमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी हातात पोस्टर्स घेऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

    आमदार रोहित पवार आणि विधान परिषदचे सभापती राम शंदे यांच्या प्रतिष्ठेची लढार्ड बनलेल्या या निवडणुकीत भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी जामखेडला आले असता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकांवरून खोचक सवाल उपस्थित करत सत्ताधान्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. 

    जामखेडची एमआयडीसी कुणी रोखली? जामखेड चा विकास निधी आणि अध्यात्मिक स्थळांचा निधी कोणी अडवला? जामखेडचा सीसीटी्ही प्रकल्प का रखडला? गुंडांना परदेशात कुणी पळवले? असे फलक यावेळी अंदोलकांनी दाखविले. 


    यावेळी परिस्थिती चिघ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निदर्शने करणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख मयूर डोके, विधानसभा प्रमुख गणेश उगले नितीन ससाने. योगेश शिंदे. संदीप उगले. संयोग सोनवणे यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post