जामखेड ताल्क्यातील खांडवी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन जखमी महिलेला भेट दिली. तसेचयोग्य ते औषध उपचार करण्यासाठी तेथील डॉक्टरांशी संपर्क केला.
तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे खांडवी बावी तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तरी नागरिकांनी आपली व आपल्या शेतातील गोठ्यातील प्राण्यांची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव उषा सोदागर चव्हाण (वय ४५) असे आहे. सदर महिलेस बिबट्याने चावा घेतल्याने बरीच मोठी जखम झाली आहे. त्या महिलेस जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर येथे पूढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. व सध्या पूढील उपचार सुरू आहेत. जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सदर महिलेसची सिव्हिल हॉस्पिटल येथे भेट घेतली.व महिला व कुटंबीयांना धिर दिला.
दि.१ डिसेंबर रोजी जामखेड तालक्यातील खांडवी येथे ही घटना घडली आहे. बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. मात्र यावेळी महिलेने आरडा ओरडा केल्यामुळे तो बिबट्या सोड्न पळून गेला. त्यामुळे जीवावरचे संकट पायावर निभावून गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सदर माहिती संजय कोठारी यांनी वनाधिकारी राठोड यांना दिली. सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
घटनेची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड तालुक्यातील उषा सौदागर चव्हाण वय 45 पाटोदा गटाचे महिलेस बिबट्याने चावा घेतल्याने बरीच मोठी जखम झाली आहे त्या महिलेस जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सिविल हॉस्पिटल येथे दाखल केले असून पुढील उपचार चालू झाले आहेत त्यांना मी भेट देऊन आलो नातेवाईक भेटले तेथील डॉक्टरांना सहकार्य करावे अशी डॉक्टरांसोबत चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आहे.
Tags
बिबट्याचा हल्ला