विजयी नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनसभापती शिंदे यांच्यासह मुंबईत घेतली भेट

जामखेड प्रतिनिधी 

नगरपरिषद निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिका-यांचे कौतुक करत, अभिनंदन केले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह तब्बल १५ नगरसेवक निवडून आले आहेत. या यशात मुख्यमंत्री फडणवीस यांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपचे पदाधिका यांनी मंगळवारी (ता. २३) थेट मुंबई गाठली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह जामखेडचे नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांचे पती अमित चिंतामणी नगरसेवक प्रवीण सानप व भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब ढवळे. यांनी मुंबईत सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत, जामखेडला प्रचारसभेला वेळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, फडणवीस यांचा या पदाधिका-यांनी सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post