नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार समारंभ
जामखेड प्रतिनिधी
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेडच्या सभेत म्हणाले होते की, राम शिंदे आमचे हेडमास्तर आहेत. आम्हाला त्यांचे ऐकावे लागते. तुम्हीही यावेळी त्यांचे ऐका. शिंदे साहेब जे मागतील ते कामे व निधी देण्याची जबाबदारी माझी असेल. जामखेड करांनी आमचे ऐकले व नगरपरिषद निवडणूकीत आम्हाला भरभरून यश दिले आता आपण जामखेडचा चेहरा मोहरा बदलू लवकरच शहरा बाहेरून रिंग रोड व शहरातील सर्व रस्ते काँक्रेटचे करू'असे प्रतिपादन सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेड नगरपरिषद निवडणकीतील यशाबद्दल शुक्रवारी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधूकर राळेभात होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की. या विजयाने आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्या उमेदवारांवर विरोधकांनी विषारी टिका केली. त्यांच्याकडे विकासाचा मद्दा नव्हता. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आपल्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी आपण त्यांनाही बरोबर घेऊन विकासाची दिशा ठरवू, असे म्हणून त्यांनी निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या उमेदवारांचा नामा उल्लेख केला. विधानसभा पराभवाची परतफेड जामखेड करांनी नगरपरिषद निकालाने केली आहे. असे ते म्हणाले.
खेड पासून खर्डा पर्यंत सर्व मोठ्या गावचे सरपंच भाजपचे आहेत. एकूणच कर्जत व जामखेड तालुक्यात सध्या भाजपचेच वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपालाच यश मिळेल असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
ज्यांना माणसे सांभाळता येत नाहीत ते माणुसघाणे आहेत. अशा शब्दात आ. रोहीत पवार यांच्यावर यावेळी राम शिंदे यांनी टीका केली.
यावेळी लोक मतातून निवडून आलेल्या प्रथम नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक सुमन शेळके, श्रीराम डोके, अॅड प्रविण सानप. पोपट राळेभात, सिमा रवींद्र कुलकर्णी, विकी घायतडक, प्रांजल अमित चिंतामणी. हर्षद काळे, नंदा प्रविण होळकर. मोहन पवार, वैशाली अर्जन म्हेत्रे, तात्याराम पोकळे संजय काशिद,आशाबाई टकले. जया संतोष गव्हाळे या पंधरा नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पराभूत उमेदवारांचाही प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की. सभापती प्रा राम शिंदे साहेबांनी आज विजयी उमेदवारांचा सत्कार केला. तर पराभूत उमेदवारांना मायेची शाल घातली आपला कोण आहे हे जामखेड करांनी ओळखले आहे, नगरपरिषदेच्या घवघवीत यशामळे आपली जबाबदारी वाढली आहे. आता सभापतींचा सन्मान महाराष्ट्रात वाढेल असे काम करावे असे त्यांनी आवाहन केले.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, नगराध्यक्ष हे पद मिरवण्यासाठी नाही तर जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राजकारण हे सेवेसाठी असते हे शिंदे साहेबांनी आम्हाला दाखवून दिले आहे. माझ्या आजे सासू कौशल्याबाई गजानन चिंतामणी ग्रामपंचायत सदस्या असताना 1974 साली भतवडा तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली होती. आजपर्यत जामखेड शहराला या योजनेतून पाणी पुरवठा सुरू आहे. आता माझ्या काळात सभापती प्रा.राम शिंदे यांच्या कृपाशीर्वादाने जामखेडकरांना उजणीतून पाणी मिळणार आहे.
यावेळी दत्ता वारे बापुराव ढवळे, शेखर खरमरे, सभापती शरद कार्ले. डॉ. भगवानराव मुरुमकर , अजय काशिद, प्रविण घूले, कैलास शेवाळे, संजिवनी पाटील. संपत बावडकर, अनिल गदादे. संतोष म्हेत्रे, पांडुरंग उबाळे, रवी सुरवसे यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी भाजपा तालकाध्यक्ष बापूराव ढवळे, सभापती शरद कार्ले भजप जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, प्रविण घूले, विजय चौधरी. शेखर खरमाळे, अशोक खेडकर गणेश क्षिरसागर, डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, वैजनाथ पाटील, सोमनाथ पाचारणे, विष्णू भोंडवे. प्रविण चोरडिया, लक्ष्मी पवार, ज्ञानेश्वर झेंडे, बाजीराव गोपाळघरे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत राळेभात, अर्जुन म्हेत्रे, सचिन घुमरे, राहुल बेदमुथ्था, केदार रसाळ, प्रविण होळकर, मनोज कुलकर्णी, उद्धव हुलगुंडे, राम पवार, तुषार बोथरा यांच्या सह अनेक भाजपा
पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमित चिंतामणी यांनी केले तर नगरसेवक प्रवीण सानप यांनी आभार मानले.