जामखेड (प्रतिनिधी): जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील संशोधक विद्यार्थी व युवा शास्त्रज्ञ रणजित रावसाहेब राऊत यांना शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे भगवान महाविद्यालय आष्टी आयोजीत "गंगाई बाबाजी कला रौप्य महोत्सव" २०२५-२०२६ यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श प्राणी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणजित राऊत हे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राणीशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी म्हणून कार्यरत आहेत.
हा पुरस्कार आज दि. १ जानेवारी २०२६ रोजी, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे आष्टी येथील भगवान महाविद्यालयात आयोजित भव्य "गंगाई बाबाजी कला रौप्य महोत्सव" २०२५-२०२६ या कार्यक्रमात माजी आ.भीमराव धोंडे व सौ.दमयंतीताई धोंडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डॉ.अजयदादा धोंडे, युवानेते अभयराजे धोंडे, झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे प्रशासकीय अधिकारी डी.बी. राऊत,भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य डॉ.आप्पासाहेब टाळके व मान्यवर उपस्थित होते.
रणजित राऊत हे योगेश्वरी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागात संशोधन करत असून, त्यांनी जैवविविधता संवर्धन, प्राणी संरक्षण, मानव–वन्यजीव संघर्ष, पर्यावरणीय जनजागृती आणि सामाजिक स्तरावर प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.राऊत यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख व राऊत यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ.जी.डी.सूर्यवंशी, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख,प्राध्यापक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. विश्वास चव्हाण, प्रा.डॉ.बबन इंगोले (वरीष्ठ शास्त्रज्ञ), प्रा.डॉ.अनिल कुऱ्हे, प्रा.डॉ.जे.डी.शेख, प्रा.डॉ.राम चव्हाण, प्रा.डॉ.रुपेंद्र भागडे, प्रा.डॉ.ए.एम.भोसले,प्रा.डॉ.व्हि.बी.साखरे, प्रा.डॉ.सोमनाथ वाघमारे, प्रा.डॉ.बी.ए.पवार, प्रा.डॉ.सुधाकर कुऱ्हाडे, प्रा.डॉ. संतोष रणखांब, प्रा.डॉ.नितीन पडवळ,प्राचार्य डॉ.पी.एम.दिघे, प्राचार्य डॉ.फारुकी, प्रा.डॉ.आर.ए.पवार, प्रा.डॉ.विद्या प्रधान, प्रा.डॉ.यास्मिन शेख, प्रा.डॉ.सुनिल पोकळे, प्रा.डॉ.अतुल चौरपगार, प्रा.डॉ.टि.एस.पठाण, प्रा.डॉ.प्रशांत हराळे, प्रा.डॉ.एस.एल.काकड, प्रा.डॉ.किशन थेटे, प्रा.डॉ.बी.जे. उगले, प्रा.डॉ.फिरोज शेख, प्रा. डॉ.मुजीब शेख, प्रा.डॉ. आत्माराम आंधळे, प्रा.डॉ. विलास जीवतोडे, ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड चे संचालक डॉ.शोभाताई आरोळे, डॉ.रवीदादा आरोळे, समाजसेवक जयेश कांबळे, विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान मलठण चे अध्यक्ष पोपट (आबा) खोसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगाव चे अध्यक्ष नवनाथ शिंदे, अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय सर्वांगीण विकास संस्थेच्या अध्यक्ष सौ.रेश्माताई मंडलिक, कृष्णाली फाउंडेशन व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियंका पाटिल शेळके बोबडे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय आदर्श प्राणी मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक, संशोधन व पर्यावरण क्षेत्रातून रणजित राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.