जामखेडला जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात संपन्न


जामखेड प्रतिनिधी
जामखेड च्या जगदंबा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाभरातून 150 खेळाडूंनी सहभाग घेतला. 

या स्पर्धेतील विजेते खेळाडू सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली. 

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग येथे ते 27 व 28 डिसेंबरला 35 व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा होत आहेत. या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने जगदंबा मंगल कार्यालय खर्डा रोड जामखेड येथे रविवारी अहिल्यानगर जिल्हा सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य हरिभाऊ बेलेकर, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य तसेच संत गोरोबाकाका पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष अलताफ कडकाले, संजय बेरड, नागेश विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आबासाहेब जायगुडे, घनश्याम डूचे, आनंद राजगुरू आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. 

या स्पर्धेमध्ये विविध वजन गटातील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
मुले - 18 किलो वजन गट श्री उदबत्ते, 21 किलो ऍलेक्स अवसरमल 23 किलो विराट पाटील 25 किलो शिवांश धामणे 27 किलो राजेश भिंगारदिवे 29 किलो आरव शिंदे 32 किलो शिवम वाघमारे 35 किलो सिद्धांत त्रिपाठी 38 किलो सोमेश्वर कदम 41 किलो ओम ठोंबरे 44 किलो आयुष भुजबळ 50 किलो रणवीर चव्हाण 50 किलो वरील शिवतेज येवले

मुली - 16 किलो वजन गट गार्गी आकडे 18 किलो शैशा मगर 20 किलो वेदांती दळवी 22 किलो स्वाती खाडे 24 किलो केतकी सरोदे 26 किलो अनुजा सुकळकर 29 किलो समृद्धी भोसले 32 किलो दीक्षा साळवे 35 किलो सृष्टी उदमले 38 किलो आराध्या पवार 41 किलो गार्गीश्री पवार 47 किलो गौरी खर्डेकर 47 किलो वरील वजन गट आस्ता पवार

या खेळाडूंना सुरेश वाघ, शकील सय्यद, दिनेशसिंह राजपूत, महेश मुरादे, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, रवी यादव गणेश धीवर सागर सानप पायल असलकर आदींचे मार्गदर्शन लाभले. 




Post a Comment

Previous Post Next Post