भवरवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ


भागवताचार्य व रामानाचार्य ह. भ. प. कांताबाई सोनटक्के यांनी केले सप्ताहाचे आयोजन 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
  तीर्थक्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान भवरवाडी ता. जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भवरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात झाली आहे. दि २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तने होणार आसल्याची माहिती भागवताचार्य व रामानाचार्य ह. भ. प कांताबाई महाराज सोनटक्के यांनी दिली आहे.
  या वर्षीचे या सप्ताहाचे २३ वे वर्ष आहे. या मध्ये दि २६ रोजी दुपारी ४ ते ५ वा. ह. भ. प आजिनाथ महाराज गळगटे, आष्टा व ह. भ. प सुप्रियाताई सावंत वाकी यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ ह. भ. प. हरीश्चंद्र महाराज शिकेतोड रामानाचार्य भुम यांचे कीर्तन होणार आहे. दि २७ फेब्रुवारी रोजी ह. भ. प बबीताताई बोडके मॅडम आष्टी व ह. भ. प. आरतीताई मते वाकी यांचे प्रवचन तर ह.भ.प अश्विनीताई महाराज मात्रे मुंबईकर यांचे कीर्तन होणार आहे. दि २८ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. रामदासी महाराज व भागवत महाराज बामदाळे आष्टा.ह.ना, व ह. भ. प. राम महाराज डोंगरे आंधळेवाडी यांचे प्रवचन तर ह. भ. प. शिवाजी महाराज ढवळे श्री संत सावता आश्रम, बोधेगाव यांचे कीर्तन होणार आहे. दि १ मार्च रोजी ह. भ. प. भारत महाराज जाधव, श्री संत कैकाडी महाराज मठ, पंढरपूर यांचे प्रवचन तर ह. भ. प. छगन महाराज खडके, प्रति इंदोरीकर, संगमनेर यांचे कीर्तन होणार आहे.
  गुरुवार दि २ मार्च रोजी सकाळी १० ते १२ वाजता भागवताचार्य ह. भ. प. कांताबाई महाराज सोनटक्के भवरवाडी यांच्या अमृततृल्य काल्याच्या कीर्तनाने  सप्ताहाची सांगता होणार आहे. कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या पाच दिवस चालणार्‍या या अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्त, वारकरी व ग्रामस्थांनी उपस्थित रहाण्याचे अवहान ह. भ. प. कांताबाई सोनटक्के महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post