गणेश महाराज पवळे यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ कीर्तनकार गणेश महाराज पवळे उर्फ गणेशानंद महाराज यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. 
  गणपत महाराज पवळे हे मूळचे आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावचे रहिवासी. अनेक वर्ष देवळालीत त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर अनेक वर्ष ते जामखेड या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. त्या काळामध्ये तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्वच घटकांची त्यांचा जवळून संपर्क आला होता. प्रवचनकार कीर्तनकार प्रबोधनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य अशी त्यांची ख्याती होती. जामखेड येथील पंचदेवालय तसेच जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज मंदिर या ठिकाणी काही दिवस त्यांनी सेवा केली. जामखेड मध्ये त्यांचा बहुतेक करून मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार होता. गेल्या काही वर्षापासून आष्टी तालुक्यातील धानोरा या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. 
 सोमवारी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. धानोरा येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी सुमन,  मुलगी माधुरी राऊत, संतोष पवळे, युवराज पवळे, उद्धव पवळे व दीपक पवळे ही चार मुले असा परिवार आहे. 
  त्यांच्या जाण्याने आष्टी तालुक्यात व जामखेड तालुक्यातील वारकरी संप्रदायामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजतात संप्रदायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 
  बुधवारी दिनांक एक मार्च रोजी धानोरा येथील अमरधाम येथे त्यांचा दशक्रिया विधी होणार असल्याची माहिती मुलगा दीपक पवळे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post