महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष
पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि प प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथे चार सिलिंग फॅन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले पांडूराजे यांचे काम राजासारखे आहे. तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यात कुठेही कोणास अडचण आल्यास पांडूराजे यांच्या नावावर काम होते. उन्हाळा जवळ आला आहे शाळेतील लहान मुलांचा विचार करून त्यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेत चार सिलिंग फॅन दिले. आहेत तसेच मुलांना खाऊ वाटप केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी ,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,जि प प्रा शाळा महादेवगल्ली मुख्याध्यापिका सुमन पाडळे, बालाजी चव्हाण सर , संजय घोडके सर, जगन्नाथ, शर्मा मेजर, म्हेत्रे, गणेश जोशी ,उत्कर्ष कुलकर्णी, भाऊ पोटफोडे, उमेश पवार ,सुंदर पवार ,गणेश काळे, विशाल पठाडे, अमोल पाचंग्रे बाळासाहेब ढाळे, शिवाजी नाना खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पांडुरंग भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
जामखेड