धामणगाव शाळेतील मुली होणार आत्मनिर्भर आत्मरक्षणासाठी घेत आहेत तायक्वांदो चे प्रशिक्षण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड तालुक्यातील धामणगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली सध्या तायक्वांदो या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. मुलींचा आत्मविश्वास वाढण्यासाठी व त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शासनाचा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. ग्रामीण भागातील मुलींना याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल. 
    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०,२५९ उच्च माध्यमिक आणि १२७९ माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत Taekwondo, Wushu, Karate, Judo, Western boxing, kickboxing, muay thai, jiu - jitsu/jujutsu, krav. Maga Aikido, Jee Kune Doforand, व इतर भारतीय मार्शल आर्ट या खेळांचा समावेश करून मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. 

 या उपक्रमाच्या माध्यमातून गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सुरेश कुंभार,यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील ३४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील तेलंगशी या केंद्रातील धामणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख श्री. केशव गायकवाड सर, शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री रुपेश वाणी सर, यांच्या मार्गदर्शनाने तसेच श्री किसन वराट सर, श्री नारायण लहाने सर, श्री चंद्रकांत पांडुळे सर, श्री एकनाथ गायकवाड सर, श्री गणेश काटे सर, श्री अर्जुन होले सर, श्रीमती स्वाती गोरे सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण सुरू आहे.
    राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेचे जामखेड तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत जमदाडे हे या शाळेतील मुलींना तायक्वांदोचे प्रशिक्षण देत आहेत. त्याचबरोबर त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत. व त्यांच्या सक्षमीकरणासाठी परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये इतर शाळेवर अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सहसचिव अल्ताफ कडकाले, ज्ञानेश्वर जमदाडे, सचिन बारगजे कु. तनिष्का डाडर हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.


मुलींनी शारीरिक दृष्ट्या सक्षम बनुन आत्मरक्षा करणे ही काळाची गरज आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.
श्री रुपेश सुभाष वाणी सर 
उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा धामणगाव

Post a Comment

Previous Post Next Post