जि.प.शाळा वाकी शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी !! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी‌.
मराठी राजभाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.आज या दिनाचे औचित्य साधून जि.प.प्रा.शाळा वाकी या ठिकाणी मोठ्या आनंदी वातावरणात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.या वेळी शाळेतील मुला - मुलींनी छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.मराठी भाषेचा गुणगौरव करण्यारे गीते सादर केली.सुंदर असे नृत्य सादर केले.भाषेचे महत्व सांगितले.
सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री.सातपुते सर,श्री.पाचारणे सर,श्री.भालेराव सर,श्री.वटाणे सर,श्री.घोडे सर,श्री.डमाळे सर,श्रीम.शेंदुरकर मॅडम  यांनी मुलांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. श्री. राजकुमार सावंत,उपाध्यक्ष श्री.आण्णासाहेब वायसे.तसेच इतर सदस्य यांनी सहकार्य केले व कार्यक्रम पाहून मुलांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post