राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत पुमसेत महाराष्ट्र अव्वल; 2 सुवर्ण, 1 रौप्य क्युरोगीत 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 ब्राँझ

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
कटक (ओडिशा) येथे आयोजित राष्ट्रीय सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत पुमसे प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकासह देशात अव्वल स्थान टकाविले आहे. क्युरोगीमध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 ब्राँझ पदके पटकाविली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्युरोगी व पुमसे संघाने चमकदार कामगिरी केली आहे. 

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एकूण 13 पदकांची कमाई केली. पुमसेमध्ये मुले व मुलींच्या गटाने सुवर्ण पदके मिळवून दिली. तर सोहम खामकर व स्वरा नितोरे यांनी सुवर्ण मिळवून दिले. या सर्व खेळाडूंना संघ व्यावस्थापक अजित घारगे,संघ प्रशिक्षक प्रशांत टी. कांबळे, व दिनेशसिंग राजपूरत. पुमसे प्रशिक्षक रॉबिन वॉल्टर मेनेझेस यांचे मार्गदर्शन लाभले. 
राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेते 
पुमसे : अर्णव दिलीप जगताप, ग्रेसन अंकुर गावित व शौर्य धनंजय जाधव (सुवर्ण), तनिष्का जयेश वेल्हाळ, आर्या चव्हाण व प्रतीती देसाई (सुवर्ण), अर्णव दिलीप जगताप (रौप्य), तनिष्का जयेश वेल्हाळ (रौप्य), राधिका ऋषिकेश भोसले व ग्रेसन अंकुर गावित (रौप्य), 
क्युरोगी मुले : सोहम खामकर (सुवर्ण), जैद मोहम्मद हमदुले (रौप्य), यश पास्टे (ब्राँझ), मुली : स्वरा नितोरे (सुवर्ण), संचिता घानेकर (रौप्य), अनन्या रायसिंग (ब्राँझ), सुरभी पाटील (ब्राँझ), वैष्णवी बेरड (ब्राँझ), आर्या काळे (ब्राँझ), सेजल श्रीमल (ब्राँझ), 
पदक विजेत्या खेळाडूंचे व संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. गणेश इशारी, महासचिव आर. डी. मंगेशकर, कोषाध्यक्ष जस्वीरसिंह गिल,संतोष मोहंती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, अजित घारगे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर बालाजी जोगदंड, यांनी अभिनंदन केले. 
AD 

Post a Comment

Previous Post Next Post