शालेय राष्ट्रीय स्पर्धेची ‘एसजीएफआय’ची घोषणा19 वर्षे गटाखालील 21 खेळांचे आयोजन तायक्वांदोचाही समावेश



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
गेल्या तीन वर्षांमध्ये शालेत राष्ट्रीय स्पर्धा झालेल्या नाहीत. कोरोना काळात खेळाडूंना सरळ गुण देण्यात आले. मात्र, यावर्षी भारतीय शालेय खेळ महासंघच्या अडचणींमुळे राष्ट्रीय स्पर्धा वेळेत घेता आल्या नाही. परंतु, आता या खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी ‘एसजीएफआय’ने 19 वर्षे गटातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसे, एक पत्र सर्व क्रीडा अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे या गटातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातवरण आहे. 
भारतीय शालेय खेळ महासंघद्वारा दरवर्षी 14, 17 व 19 वर्षे गटाच्या विविध शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे विविध खेळ प्रकारातील खेळाडू सहभागी होत असतात. कोरोना काळात बंद झालेल्या या स्पर्धा पुढे तीन वर्षे झालेल्या नाहीत. यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. परंतु, यावर्षी राज्य शासनाने राज्य स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंचे होणारे हे नुकसान भरून काढले आहे. यामध्ये एकूण 41 खेळांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, भारतीय शालेय खेळ महासंघातील वादामुळे यावर्षी राष्ट्रीय स्पर्धा होण्यावर प्रश्न चिंन्ह निर्माण झाले होते. परंतु, भारतीय शालेय खेळ महासंघाच्या निवडणूक होऊन नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती झाली. देशातील विविध खेळ संघटना, तसेच राज्यांनी खेळ महासंघाकडे यावर्षी राष्ट्रीय स्पर्धा आयोजना बाबात पत्र व्यावहार केला होता. त्या प्रमाणे महासंघाने 19 वर्षे गटातील खेळाडूंचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उशीरा का होईना या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये फक्त 21 खेळांनांच मान्यता देण्यात आलेली आहे. 

राष्ट्रीय स्पर्धा होणारे खेळ
जलतरण, कुस्ती, बास्केटबॉल, वेटलिफ्टींग, तायक्वांदो, योगासन, खो-खो, कबड्डी, शुटींग, बुद्धीबळ, टेनिस, हॅण्डबॉल, जिमनास्टिक्स, हॉकी, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, फुटबॉल, ज्युदो, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस. 

दिल्ली, मध्येप्रदेशमध्ये स्पर्धा 
राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनाबाबत दिल्ली आणि मध्य प्रदेशने भारतीय खेळ महासंघकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याप्रमाणे 13 खेळांच्या स्पर्धा दिल्लीमध्ये, तर दोन खेळांच्या स्पर्धा ग्वालियर, तर भोपाळमध्ये 6 खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये 13 खेळ 6 ते 12 जून दरम्यान, तर अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग खेळांच्या स्पर्धा 6 ते 9 जून, हॉकी, बॅडमिंटन 8 ते 9 जून, फुटबॉल, ज्युदो, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिसच्या स्पर्धा 10 ते 13 जूनमध्ये होणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post