किरकोळ वादातून जामखेड तालुक्यात शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने खून


जामखेड प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यातील मोहरी येथे शेतातून गुरे नेण्याचा कारणावरून किरकोळ कारणावरून 53 वर्षीय व्यक्तीचा चार जणांकडून खून करण्यात आला आहे. की खळबळ जनक घटना आज दिनांक 3 रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत अशोक धोंडीबा हाळनावर ( वय ५३ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चारही आरोपींना खर्डा पोलीसांनी जेरबंद केले आहे. 

  या बाबत मयत अशोक धोंडीबा हाळणावर यांचा मुलगा आनंद अशोक हाळणावर वय ३० याने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझे वडिल अशोक धोंडीबा हाळवणकर हे आमच्या घरापासून तेलंगशी फाटा येथे आमच्या शेतामध्ये दररोज जणावरे चारण्यासाठी घेवुन जात होतो. नेहमीप्रमाणे आज दि. ३ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जानावरे घेवून तेलंगशी फाटा येथे जाण्याकरीता निघालो असता, माझा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हाळणावर याने माझ्या वडीलांना तुम्ही शेतातून गुरे घेवून जावू नका. असे म्हणुन शिवीगाळ करून तुम्ही गुरे घेवून गेला तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यावेळी माझे वडीलांनी त्यास तु मला शिवीगाळ करू नको, आपले जमीनीचे वाटप झालेले नाही. असे म्हणून वडील अशोक हे आमचे सामाईक पडीक शेतामधून जणावरे घेवून जात असताना. त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने वार 
केल्यामुळे ते जागीच कोसळले आम्ही त्यांना जामखेड रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय तपासणी यंत्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
आनंद अशोक हाळणावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर यांनी माझे वडीलांना हाताने मारहाण केली व युवराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कुऱ्हाडी माझे वडीलांचे मानेवर, गळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे. फिर्यादीवरून गु. र. रजि. नं. 134/2023 भा.द.वि. 302,323,504,506 प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post