डॉ. मिसबा शेख ठरल्या जामखेड तालुक्यातील पहिल्या नेत्रतज्ज्ञ (एम. एस)

जामखेड प्रतिनिधी
डॉ. मिसबा फारूख शेख यांनी नेत्ररोगतज्ज्ञ, एम.एस. या पदवीत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. जामखेड तालुक्यातील नेत्ररोगतज्ज्ञ मास्टर परिक्षेत पास होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
मिसबा या जामखेड येथिल प्रसिद्ध डॉक्टर फारुख शेख यांच्या कन्या आहेत. 

डॉ. मिसबा यांनी आपल्या शिक्षणातील यशाचा वाढता आलेख कायम ठेवला. त्यांनी ल. ना होशिंग विद्यालयातून १० वीला ९८.५५% मिळवून प्रथम क्रमांक मिळवली. तर बारावीला सारडा महाविद्यालयतून ८६% गुण घेऊन पुणे बोर्डात पहिल्या शंभरमध्ये नंबर आला होता. त्यानंतर त्यांनी मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला. अतिशय जिद्दीने व चिकाटीने एमबीबीएसची पदवी घेतली.
    पूणे वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र शस्त्रक्रियेची पदवी प्राप्त केली. या एमआयटी लातूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मिसबा यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. डॉ. मिसबा शेख या जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध डॉ. फारख शेख, डॉ. बिल्कीस बानो यांची कन्या तर जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉ. सादिक पठाण यांच्या भाची आहेत. डॉ. मिसबा या नेत्रशस्त्रक्रिया पदवी प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील प्रथम महिला डॉक्टर ठरल्या आहेत. या यशाबद्दल डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. मिसबा यांचे अभिनंदन केले जात आहे.



Post a Comment

Previous Post Next Post