कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड


     महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : "वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन काॅन्फरन्स, वन विभाग आणि कोठारी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

जैन काॅन्फरन्स, वन विभाग आणि कोठारी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जामखेड बीड रस्त्यावर सौताडा घाट परिसरात तहसीलदार यौगेश चंद्रे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, नगरसेवक अमीत चिंतामणी , डॉ. अमोल भगत, उद्योगपती प्रवीण छाजेड, पत्रकार संतराम सूळ ,युवा उद्योजक आणि वर्धमान गणेश प्रतिष्ठान ट्रस्ट बदनापूरचे संचालक ललित बाफना, कालीका पोदारचे संचालक निलेश तवटे, समृद्धी मिल्क चे संचालक वैभव कुलकर्णी, शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, अभिजीत लोहकरे, युवा उद्योजक सचिन गाडे, तेजस कोठारी ,श्याम पंडित,सनी सदाफुले, निखिल कुमकर, नागेश घायाळ , वन विभागाचे आदिनाथ भोसले ,वनरक्षक प्रवीण उबाळे, किसन पवार, वनसेवक राठोड , ताहेर अली सय्यद, शामराव डोंगरे ,शरद सूर्यवंशी, माळशिकारे ,भाऊसाहेब भोगल ,बबन महानोर, श्री अडसूळ व कर्मचारी उपस्थित होते.
 
दरम्यान जामखेडचे तहसीलदार योगेशजी चंद्रे यांच्या हस्ते वृक्षाची विधीयुक्त पूजा करून वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वृक्षलागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे वृक्ष लागवडीबाबत असलेली तळमळ दिसून येते. वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेले उपक्रम संजय कोठारी राबवण्यात पुढे असतात.

 यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले, संजय कोठारी यांचे कार्य प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय आहे. त्यांचे काम पाहून आम्ही छोटे मोठे कार्य करत असतो. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करत असतो.
 
यावेळी वन कर्मचारी ताहेर आली सय्यद म्हणाले, गेल्या वीस वर्षापासून संजय कोठारी यांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. आमच्या वन कर्मचा-यांना ते सतत मदत करत असतात. ते अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम तर करतच आहेत परंतु मुक्या प्राण्यांना पक्षांना सुद्धा ते वाचवण्याचं काम करत आहेत. आत्तापर्यंत दोन वेळेस मोर जखमी झाले होते .सायाळ जखमी झाले होते हरिण काळविंट घुबड,कासव अशा अनेक प्राण्यांना पक्षांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णवाहिकेत आणून जामखेड येथील पशू डॉक्टरांकडे त्याच्यावर इलाज करून आमच्या माध्यमातून पुन्हा जंगलात सोडण्यात आले होते. वृक्षारोपण करून नवीन दिशा त्यांनी दाखवली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आम्ही गेली तीस वर्षापासून वृक्षारोपण करत आहोत आणि संगोपन करण्याचं सुद्धा आम्ही लक्ष देतो तसेच आम्ही लावलेले झाडापैकी दहा-वीस टक्के जरी झाड आले तरी त्यामध्ये समाधान वाटते आम्ही आता फळांची झाडे लावण्याचे धोरण आखले आहे. यावर्षी साधारण पाचशे झाड लावण्याचे आमचं उद्दिष्ट आहे. असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post