महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
दरवर्षीप्रमाणे कै.डाॅ.डी.बी. खैरनार फाऊंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 45 दात्यांनी रक्तदान केले.
जामखेडचे एकेकाळचे नामांकित डॉक्टर तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन जिल्हा सरसंघचालक डॉ. दशरथ (दादा) खैरनार यांचा 21 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जात असे. यानिमित्ताने जामखेड तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व डाॅ.डी.बी. खैरनार फाऊंडेशनच्या वतीने जामखेड येथील खैरनार हॉस्पिटल येथे अनेक वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. नगर येथील जनसेवा रक्तपेढी यांच्या विशेष सहयोगाने हे शिबिर घेण्यात येते.
डॉ खैरनार दादा यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश खैरनार व प्रमोद खैरनार यांनी त्यांच्या मित्र परिवाराला सोबत घेऊन पूर्वीपासून चालत आलेला हा उपक्रम पुढेही चालू ठेवला.
24/09/23 रोजी सकाळी 9 वाजता खैरनार हॉस्पिटल येथे या रक्तदान शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले त्यानंतर दिवसभर रक्तदान सुरू होते
यावेळी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
यावेळी शांतीलाल गुगळे, कांतीलाल कोठारी, डॉ. प्रताप गायकवाड, उमेश देशमुख, मनीष मासाळ, ज्ञानेश्वर अंदुरे, संजय देशपांडे, राजेंद्र देशपांडे, लक्ष्मीकांत देशमुख, दीपक होशिंग, बाळासाहेब होशिंग, अनिल लोखंडे, डॉ. प्रकाश खैरनार, प्रमोद खैरनार डॉ. तनय खैरनार जनसेवा रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.