अमित चिंतामणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा - सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
"जामखेडचे नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या नऊ वर्षापासून गरबा दांडिया व मंगळागौर चे आयोजन करतात. त्यामुळे घरात बसलेल्या महिलांना विरंगुळा म्हणून बाहेर पडता येते. महिलांसाठी अमितभाऊ हे नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतात. त्यामुळे जामखेडच्या  महिलांनी अमित चिंतामणी यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभे रहावे " असे प्रतिपादन सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी जामखेड येथे केले.


जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे ल. ना. होशिंग विद्यालयात ओपन गरबा दांडिया व मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या " बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी - मोने व शिल्पा नवलकर या मुख्य आकर्षण ठरल्या. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी तथा माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अंजलीताई चिंतामणी ,  प्रांजलताई अमित चिंतामणी, अर्चनाताई राळेभात उपस्थित होत्या.

  
     यावेळी मनिषा सुरवसे, अर्चना राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, माजीसभापती डॉ.भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार चे सभापती शरद कार्ले,प्रा.सचिन गायवळ सर, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, मंगेश आजबे,  सुरेश पवार,नंदु गोरे, प्रविण चोरडिया,डॉ. कल्याणराव काशिद, मनोज कुलकर्णी, काकासाहेब गर्जे,ॲड. प्रवीण सानप, केदार रसाळ, विनायक राऊत,डॉ. अल्ताफ शेख,बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष बिभिषण धनवटे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, डॉ. गणेश जगताप,बापूसाहेब ढवळे, अनिल यादव, जमीर सय्यद, संतोष गव्हाळे, अभिजीत राळेभात, पांडूरंग उबाळे,ऋषिकेश मोरे आदी मान्यवरांसह हजारो महिला या  कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक अमित चिंतामणी मित्रपरिवाराने  विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post