जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी जामखेड बंद

 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असून सरकारने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही. याचा निषेधार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून उपोषणास बसले आहेत. आत्तापर्यंत सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नसून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. तरी या निर्दयी सरकारला जाग येण्यासाठी व मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका उद्या मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी जामखेड बंदचे आव्हान करण्यात आले. यावेळी समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post