दोन दिवसांत आरक्षण न दिल्यास मराठ्यांशी गाठ आहे - कु. अस्मिता वराट ची संतप्त प्रतिक्रिया


   महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
"आम्ही कितीही अभ्यास केला, कितीही टक्के मार्क मिळवले तरी आम्हाला न्याय मिळत नाही.  आमच्या उद्याच्या भविष्याचे काय?आरक्षण आमच्या हक्काचे आहे. आम्ही कुणाच्या बापाचं मागत नाहीत. त्यामुळे दोन दिवसात आरक्षण जर दिले नाही तर मराठ्यांशी गाठ आहे" ही संतप्त प्रतिक्रिया आहे जामखेड येथील साखळी उपोषणाला बसलेल्या महिलांपैकी कु. अस्मिता वराट या विद्यार्थिनीची. 

  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान रविवारी भुतडा ग्रामस्थांचे उपोषण सुरू असताना जामखेड तालुक्यातील मराठा महिला भगिनींनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी उपोषणात सहभाग घेतला. यावेळी महिलांनी अतिशय संतप्त व आक्रमक भाषणे केली. यावेळी महारुळी ग्रामपंचायतच्या सरपंच अंजली ढेपे, वाघा येथील बारस्कर श्रद्धा कात्रजकर, दिपाली भोसले, गायत्री, जरे वैशाली शिंदे, अस्मिता वराट यांची भाषणे झाली. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. 

  मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटी  येथे मनोज जरांगे पाटील यांनी 25 आँक्टोबर पासून उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये बुधवार पासून  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणास सुरु आहे.
जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की, जामखेड तालुक्यातील प्रत्येक दिवशी एक गाव या प्रमाणे साखळी उपोषण करण्यात येईल. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे.


  तसेच जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात राजकीय पक्षांच्या पुढचा-यांना गावबंदी करण्यात आली आहे. याबाबतचे फलक प्रत्येक गावात लावण्यात आले आहेत.

उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून जामखेड येथे कॅन्डल मार्च
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता मराठा क्रांती मोर्चा महिला भगिनींच्या वतीने सोमवार दि. ३०/१०/२०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता तहसील कार्यालय येथे 'कँडल मार्च' काढण्यात येणार आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post