युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीने शिवजयंती साजरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
आपल्या देशात ज्या-ज्या महामानवांनी देशात क्रांती व चांगले कार्य केले. त्या महामानवाच्या यादीत छत्रपती शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहे. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याचा फायदा अटकेपार झाला. त्यांच्या राज्यकारभाराची आजही उदाहरणे दिली जातात. तशीच राज्यपद्धती आज असायला हवी अश्याही अपेक्षा व्यक्त होत असतात. आज चांगल्या विचारांची देवाणघेवाण करून महाराजांची जयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला पाहिजे. त्यानुसार आपल्या भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करून मोहन पवार यांनी समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला आहे. आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एखाद्या तरी गुण आत्मसात कराल अशी अपेक्षा व्यक्त करत जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
जामखेड शहरातील युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीने नागेश विद्यालयाच्या पाठीमागील आपल्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात., प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक दिनकर भोरे, ताहेरभाई पठाण, नामदेव राळेभात, उमेश माळवदकर, कबीर घायतडक, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड बाळासाहेब मोरे, उमेश पवार, अनिकेत डुचे, विश्वजीत घोडके, कचरू घोडके आदींसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगर परिषदेचे माजी सभापती मोहन पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. त्या माध्यमातून महाराजांनी अठरापगड जातींचा सन्मानच केला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चालले पाहिजे. असे मत व्यक्त करून त्यांनी सर्वाना शुभेच्छा देत आभार मानले.
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच आदर्श शिक्षक दिपक तुपेरे, शिक्षा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. विकी घायतडक, मास कम्युनिकेशन परिक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल धनराज पवार, पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गायत्री भुषण राळेभात यांच्या तर्फे त्याचे सासरे नामदेव अश्या विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थराज गायकवाड, सुरज पवार, रिपब्लिकन सेनेचे मंगेश घोडेस्वार, अनिल साळवे, योगेश औचरे, गोवर्धन जाधव, अल्ताफ शेख, अनिल कांबळे, मेघराज पवार, सनी गायकवाड, अभिमान खाडे, विजय जाधव, सुनील शिंदे व अब्दुल भाई यांनी परिश्रम घेतले.
Tags
जामखेड