अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत पत्रकारांच्या हस्ते शिवजयंती साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जामखेड येथे पत्रकार संजय वारभोग, धनराज पवार यांच्या हस्ते शिव जयंती साजरी करण्यात आली. 

 यावेळी बॅंकेचे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, पत्रकार संजय वारभोग, धनराज पवार, उच्चाधिकार शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजीव मडके, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष पांडुरंग मोहळकर, बॅंकेचे शाखा व्यवस्थापक मुकुंद ढवळे, कॅशिअर दिगंबर माने, संतोष मुरुमकर, संतोष उगले, संतोष कुऱ्हे, सुरक्षा रक्षक घायतडक व इंगळे हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. व विविध मान्यवरांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post