स्टार पत्रकार दत्तात्रय राऊत यांचा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सन्मान


जामखेड पंचायत समिती शिक्षण विभागाने. पत्रकार दत्तात्रय राऊत यांना स्टार पत्रकार दै. गावकरी चा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. या प्रसंगी तालुक्यातील बहुतांशी शिक्षक. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे केंद्र प्रमुख निकम सर. केंद्र प्रमुख विक्रम बडे व नवनाथ बडे डॉक्टर उदमले. आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पत्रकारांना शाल. श्रीफळ. पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले..
सत्कारानंतर पत्रकार राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की... हा सन्मान घरच्या लोकांनी केला आहे. कारण माझे तिन काका (चुलते) प्राथमिक शिक्षक होते. माझे तिन बंधू शिक्षक आहेत. माझी सुनबाई प्राध्यापक आहे. माझी सुनबाई प्राध्यापक आहे. या आगोदर माझी पत्नी प्राथमिक शिक्षक होती. म्हणजे शिक्षण क्षेत्रासी आमचा तिन पिडयांचा संबध आहे. म्हणुन हा सन्मान घरचाच आहे. याला विषेश महत्व आहे. घरच्या शालीला ऊब जास्त असते. हा प्रसंगमला कायम प्रेरणा देत राहील. या सन्मानाने पुढे काम करण्याची ऊर्जा मिळत राहील.. शिक्षक आणि पत्रकार यांचे काम. वरवर जरी वेगळे वाटत असले तरी.. आणि माध्यम वेगळे असले तरी उद्दीष्ट एकच आहे ते म्हणजे.. विद्यार्थांना आणि लोकांना साक्षर करने. सुसंस्कारित करने. अन्यायाविरुद्ध आवाज उठवने. सत प्रवृत्तींना मदत करने. खल प्रवृत्तींस विरोध करने. समाज शांततामय मार्गाने कसा जाईल हे पहाणे. आज शिक्षण क्षेत्रात खुप बदल झाला आहे. त्यामुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तान तनावाचे प्रसंग येतात. ध्यान धारणा हे त्यावर उपाय आहे. पत्रकारांना ही खल प्रवृत्तींस तोंड द्यावे लागते. अनेकांची नाराजी सहन करावी लागते. म्हणुन पत्रकार आणि शिक्षक हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
शिक्षक हे भुतलावरचे देव समान आहेत. अशा शिक्षक वृंदा कडुन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सतत मला प्रेरणा देत राहील. माझा शिक्षक विभागाने यथोचित सन्मान केला त्या बद्दल धन्यवाद व्यक्त करतो

Post a Comment

Previous Post Next Post