संत वामनभाऊंनी समता आणि बंधुत्वाचा मंत्र दिला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत 
वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याला भक्तांचा जनसागर
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड :
    'मानवतेचे महान पुजारी म्हणून अलौकिक कार्य करणारे  संत वामनभाऊ महाराज यांच्या अत्यंत पवित्र श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर सेवेकरी होण्याचा मान दिला.याबद्दल  गहिनीनाथगडगडाच्या चरणी मी नतमस्तक होतो. असे विनम्रपणे सांगत मी उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे; तर एक सेवेकरी म्हणून येथे आलो आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेल्या संस्कारातून समाज बांधिलकी आणि अध्यात्माचे कार्य करीत आहोत. गडासाठी यापूर्वीच्या २५ कोटी रुपयांचे कामे तर करूच; पण नवीन बजेटमध्ये आणखी २५ कोटी रुपये देऊ आणि  गहिनीनाथगडगडाचा विकास आराखडा पूर्ण करू असा विश्वास देत आणि संत वामनभाऊ महाराज यांच्या कार्याची थोरवी वर्णन करत मानसाला संकटावर मात करण्याची ताकद खऱ्या अर्थाने अध्यात्म देते.संत वामनभाऊंनी समता आणि बंधुत्वाचा मंत्र दिला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    संत वामनभाऊ महाराज यांचा ४८ व्या. पुण्यतिथी सोहळा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथ गडावर आज शनिवारी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावरून भक्तांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे,गहिनीनाथगडगडाचे महंत विठ्ठल महाराज,बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर,आ.राम शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस,आ.मोनिकाताई राजळे,माजी आ.भीमराव धोंडे,आ.मोनिका राजळे,आ.लक्ष्मण पवार,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, राजस्थानचे ह.भ.प.उत्तमसिंह स्वामी महाराज,जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे,राजेश्वर चव्हाण,धनराज गुट्टे,डाॕ. अजयदादा धोंडे,जयदत्त धस,अभयराजे धोंडे,समाजसेवक विजय गोल्हार,अमर निंबाळकर ,दिपक बांगर आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.

      प्रारंभी प्रथेप्रमाणे पहाटे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामनभाऊ महाराज यांची महापूजा करण्यात आली.यावेळी सकाळी जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. ११.४५ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.डाॕ.नेहरकर यांनी स्वखर्चाने आणलेल्या हेलिकाॕप्टरमधुन संत वामनभाऊ यांंच्या समाधीवर पुष्पवृष्टी केली.त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे ओळखपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते विष्णु पवार यांना देण्यात आले.यावेळी ओमप्रकाश शेटे,खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे उपस्थित होते.

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, संत वामनभाऊ महाराजांनी मानवतावादी महान कार्य केले.गहिनीनाथगडाच्या विकासासाठी महंत विठ्ठल महाराजांची मोठी तळमळ आहे.  या गडासाठी सभागृह स्वागत कमान,प्रसादालय,भव्य कीर्तन मंडप आणि इतर सुविधा करण्यासाठी येत्या बजेटमध्ये २५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली.  गहिनीनाथगडाची महान परंपरा आहे.येथे लाखो भक्त श्रद्धेने आशीर्वादासाठी येतात.प्रत्येकाची इच्छा ही वामनभाऊंच्या आशीर्वाद मिळवण्याची असते आणि म्हणून भाविक भक्तांच्या सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संकटांवर मात करण्याची ताकद अध्यात्मात असून संतांनी माणुसकीचा मंत्र दिला.जीवनात " वारीचे " महत्त्व विशद करताना त्यांनी "वारीचा मार्ग " गहिनीनाथगड ते पंढरपूर सुकर व्हावा यासाठी चांगला मार्ग तयार करू असा विश्वास देत पंढरपुरात वारकऱ्यांसाठी जागा मिळाली आहे.त्यासाठी निधी कसा तयार करायचा ते बघू.मी खऱ्या अर्थाने ऊर्जा घेण्यासाठी येथे आलो असा विनम्रभाव त्यांनी व्यक्त केला.यावेळी पंढरपूरची जागा देणाऱ्या भक्तांचे स्वागत गहिनीनाथगड आणि मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
वारकरी संप्रदायाचा मंत्र आपण सर्वजण जपू या.एकत्र राहूया आणि  वामनभाऊंच्या आशीर्वादाखाली आनंदी मार्ग धरू असे सांगत शेवटी येथून पुढे बोलावले नाही तरी दरवर्षी गहीनाथगडावर येणार अशी भावनिक साद घालताच प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. 

    कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले की,गेल्या वीस वर्षापासून  गहिनीनाथगडाचा पूजेचा मान मला मिळतोय.मी भाग्यवान असून आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.मी अपघातातून वाचलो ही  वामनभाऊंचीच कृपा आहे. आज माझी भगिनी खासदार डॉ.प्रीतमताई आणि मी सोबत आलोत पटलं का ? असा जाहीर प्रश्न उच्चारताच प्रचंड टाळ्या वाजवून भाविक भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सेवेसाठी मला  वामनभाऊंनी येथे आणले.वारकरी संप्रदायाची सुरुवात  गहिनीनाथगडापासून झाली.येथील भक्त गरीब, विविध जाती,पंथांचे, ऊसतोड कामगार पण पुण्यतिथीला येणारच ही त्यांची निष्ठा असते. गहिनीनाथगड पुढार्‍यामुळे नाही तर गरीब ऊसतोड कामगार भक्तामुळे आहे असे ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले.यावेळी खा.डॉ.
प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की, महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सौंदर्य आले आहे.हा माझा कार्यक्रम असून भक्ती भावाने येथे येतो पंकजाताईंनी आर्थिक मदत दिली.गहिनीनाथगडाचे विकासासाठी योगदान देण्यात आम्ही कधी कमी पडणार नाहीत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,विविध संप्रदायांनी माणुसकी जतन केली.संत वामनभाऊंनी मानवतेचा उद्धार केला.
जाती तोडा आणि समाज जोडा हा संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.ह.भ.प.उत्तमसिंह स्वामी महाराज  (राजस्थान) यांनी जीवनाचा उद्धार करण्याचे हे ठिकाण असून संत आणि देव यातील फरक सांगितला.वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी  गहिनीनाथगडाचे वैभव मोठे असून महंतांनी मोठी परंपरा चालवल्याचे गौरव करत समता ऐक्य आणि बंधू भावाने राहण्याची अपेक्षा केली.केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव योजनेचा पहिला लाभार्थी ठरलेल्या पवार नामक व्यक्तीचा यावेळी प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.गहीनीनाथगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्याबद्दल डॉ.नेहरकर यांचा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य धनराज गुट्टे,विजय गोल्हार,सतीश शिंदे,जि.प.सदस्य माऊली जरांगे,कालिदास खेडकर,बबन ढाकणे,सुभाष खेडकर,ह.भ.प.ॲड.महारुद्र नागरगोजे,रामराव खेडकर,रामदास बडे,शंकर देशमुख,संतोष घोडके,बबन सांगळे,मारुती सांगळे,धर्मराज सांगळे, दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर,उत्तम बोडखे,महाराष्ट्र मुप्टा असोसिएशनचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.बिभिषण चाटे, संजय सानप,अनिल गायकवाड,प्रभाकर सुळे आदीसह राजकीय, सामाजिक,धार्मिक, वैचारिक क्षेत्रासह माध्यम प्रतिनिधीसह राज्यासह देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक भक्त उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या नियंत्रणात पोलीस विभागाने चोख कर्तव्य बजावले.
आरोग्य,परिवहन विभागानेही सहकार्य केले.प्रस्ताविक गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराजांनी केले. सूत्रसंचालन भाजप नेते शंकर देशमुख तर शेवटी ‌गहिनीनाथगडाच्यावतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post