जामखेड प्रतिनिधी.
ऊसतोड कामगारांच्या संघर्ष,वेदनामय व वास्तववादी जीवनावर आधारित परशुराम नागरगोजे लिखीत 'पाचाट' ही कादंबरी साहित्य क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवताना दिसत आहे. आत्तापर्यंत या कादंबरीला तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मातंग साहित्य परिषद, पुणे.यांचा साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार २०२४
सर्वद फाउंडेशन,मुंबई.यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय स्टार साहित्य पुरस्कार२०२४
अखिल भारतीय साहित्य संमेलन,बुलढाणा.
यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार२०२४
ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेल्या या नवलेखकाची लेखणी वाचकाच्या मनाला भुरळ घालताना दिसत आहे.गावपण, पोशिंदा,माझी आई, झेप या कविता ऐकताना ग्रामीण जीवन डोळ्यासमोर उभे राहते.तर आयुष्याची संध्याकाळ,काळजातला शर्ट,पावटा,श्रावणी सोमवार या कथा वाचताना डोळ्यातून अश्रू वाहातात.
अशा या नवलेखकांच्या 'पाचाट' या साहित्यकृतीला
जाहीर झालेल्या तीन पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.