जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रोड बाबतीत केलेल्या तक्रारीचे दुसऱ्या दिवशी दुरुस्ती चे काम करण्यात आले
जामखेड शहरांमध्ये सिमेंट
काँक्रीट रोड चे काम चालू आहे परंतु ज्या ठिकाणी काम केलेले नाही त्या रोडवर धूळ होत असल्याने रोज दिवसातून तीन वेळा पाणी मारले जाते त्या पाण्यापासून धुळीचे चिखल होऊन मोठ मोठे गट्टे झाले आहेत या गट्ट्यांमुळे टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काहीजण पडून जखमी झाले आहेत. ही सर्व माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उप अभियंता अहमदनगर दिलीप तारडे, नरेंद्र गांगोले प्रोजेक्ट डायरेक्टर धनेश्वर कंट्रक्शन,श्री गणेश सचिन पवार प्रोजेक्ट मॅनेजर तसेच रावसाहेब धांडोरे NHAI /PWD ज्युनिअर इंजिनिअर या तिघांच्या कानावर घातली या सर्वांनी पाहणी करून ताबडतोब कामाला सुरुवात केली असून रोडवरील सर्व मातीचे गट्टे काडून त्यावर मुरमाचा लेप दिलेला आहे सध्या काम चालू असल्यामुळे थोडासा त्रास सहन करा आम्ही रोज हे काम चालू ठेवणार आहे जिथे जिथे खड्डा होईल जिथे जिथे रोडवर अडचण येईल ते काढून व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात आहोत असे नरेंद्र गांगोले म्हणाले यामुळे गावातील दोन चाकी चार चाकी वाले यांना रस्ता सुरळीत करून दिलेला आहे