महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद फकराबाद शाळेत राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षण योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण उत्साहात सुरू आहे मुलींना वेळप्रसंगी स्वसंरक्षण करता यावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत मुलींसाठी तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते
जामखेड तालुक्यातील अरणगाव या केंद्रातील चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. विस्तारअधिकारी- श्री. सुनिल जाधव साहेब. केंद्रप्रमुख श्री. विक्रम बडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फकराबादचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोहळकर सर श्री उपेंद्र आढाव, श्री विजयकुमार चौधरी, श्री प्रदीप कांबळे, श्री शिवाजी ढोबे ,श्रीम.रिता कुलकर्णी ,श्रीम.वर्षा साबळे या सर्व शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे हे फक्राबाद शाळेतील मुलींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.
Tags
तायक्वांदो