वाकी शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील खर्डा केंद्रातील जि.प.प्रा.शाळा,वाकी या ठिकाणी इयत्ता आठवी या वर्गाचा निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला होता. 
    कार्यक्रम प्रसंगी आठवीतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळे कडून मिळालेले संस्कार तसेच ज्ञानाची शिदोरी ही भविष्यातील वाटचालीसाठी आम्हा सर्वांना मार्गदर्शक राहील असा विश्वास मनोगतामध्ये मुलांनी व्यक्त केला तसेच शाळेतील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्यातर्फे सर्व आठवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

    कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शाळेतील सर्व मुलांना स्वादिष्ट लापशी सांबर-भात या सुरुची भोजनाचा आस्वाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी वर्गशिक्षक श्री.संतोष डमाळे,लक्ष्मण वटाणे,शरद पाचारणे, विठ्ठल घोडे,मनिषा शेंदूरकर यांनी परिश्रम घेतले.श्री.मारुती गिते सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक श्री.मुकुंदराज सातपुते यांनी विद्यार्थ्यांना भावी दैदिप्यमान प्रगतीकामी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी व यशस्वीतेसाठी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.केशव तात्या गायकवाड साहेब व विस्तार अधिकारी मा.श्री.संजय नरवडे साहेब आणि तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी मा.श्री धनवे साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post