महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिऊर येथील विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे धडे देण्यात आले. त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.
जामखेड तालुक्यातील शिऊर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. खर्डा बीटचे विस्तार अधिकारी संजय नरवडे , केंद्र प्रमुख सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच शिऊर शाळेचे मुख्याध्यापक संतोष वांढरे, नामदेव गर्जे, संदीप शेलार, तेजश्विन मासाळकर, आशा माने, निर्मला काळे, स्मिता सोनवणे या सर्व शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व त्यांचे सह प्रशिक्षक शिऊर शाळेतील मुलींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.
Tags
तायक्वांदो