रत्नापूर जि. प. प्राथमिक शाळेत तायक्वांदोचे प्रशिक्षण, मुलींचा उस्फूर्त सहभाग

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील रत्नापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये शाळेतील मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

जामखेड तालुक्यातील रत्नापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. 
विस्तारअधिकारी- श्री. सुनिल जाधव साहेब. केंद्रप्रमुख श्री. राम निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 

    तसेच मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला संभाजी उगले  पदवीधर शिक्षक श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड, 
पदवीधर शिक्षक श्री गौतम गहिनीनाथ सोले, श्रीमती वैशाली घुमरे मॅडम, श्रीमती.शमिम शेख मॅडम, श्रीमती स्मिता निंबाळकर मॅडम श्री. बाबासाहेब औटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. 

    राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेचे तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे शाळेतील मुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. वेळप्रसंगी स्वतःचे रक्षण करण्यासाठी या प्रशिक्षणाचा या विद्यार्थिनींना नक्कीच फायदा होईल.

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. 

    जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post