जामखेड प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत जामखेड तालुक्यातील पिंपरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उपविजेतेपद मिळविले आहे.
क्रीडा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील दा.ह.धाडगे पाटील विद्यालय (त्रिमूर्ती) येथे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड या शाळेतील मुलांच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व या स्पर्धेतील उपविजेतेपद मिळविले.
पिंपरखेड शाळेतील, वामन सूर्यकांत ढवळे, अनुरुद्र बापू रोही, स्वप्नील अशोक ढवळे,प्रणव महादेव कदम, वीरेंद्र पोपट गायकवाड, आदर्श परमेश्वर ढवळे, नुमान जावेद सय्यद, संकेत सुभाष लबडे, ओमकार दादासाहेब बांगर, आकाश अविनाश चोरगे , करण रामदास कदम या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा.श्री.भास्कर पाटील साहेब यांनी मैदानावर भेट देत विशेष अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना गट शिक्षणधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले.
या सर्व खेळाडूंना पिंपरखेड शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले सर, प्रवीण शिंदे सर, सुभाष सरोदे सर, रवींद्र इंगुले सर, अंगद कोथमिरे सर, भगवान साळुंखे सर, श्रीमती सुशीला जरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब, खर्डा बीटचे विस्तार अधिकारी सुनील जाधव साहेब , केंद्र प्रमुख विक्रम बडे साहेब यांनी अभिनंदन केले आहे.