महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथील विद्यार्थिनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा या केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब ,विस्तार अधिकारी श्री.संजय नरवडे, केंद्रप्रमुख श्री.केशव तात्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापिका श्रीमती गंगा भोसले, कविता माने, स्मिता डोंगरे, रत्नप्रभा शिरसाठ, व्यंकटेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर दाते, गणेश देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू आहे.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व सौ. सविता संतोष बारगजे हे येथील विद्यार्थिनींना तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.
Tags
तायक्वांदो