जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा उर्दू शाळेतील मुली घेत आहेत तायक्वांदोचे प्रशिक्षण

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा उर्दू येथे सध्या तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. मुलींना वेळप्रसंगी स्वतःचे रक्षण करता यावे तसेच व्यायामाची सवय लागावी यासाठी हे प्रशिक्षण शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थिनींना काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याचा आनंद होत आहे.

    जामखेड तालुक्यातील खर्डा या केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा उर्दू येथे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब ,विस्तार अधिकारी मा.श्री.संजय नरवडे, केंद्रप्रमुख मा.श्री.केशव तात्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे मुख्याध्यापक हुसेनबादशाहा महेमुद मोमीन, अब्दुलमुईद अहेमद शेख, समिना कासम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. 

    राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' प्रशिक्षण योजनेचे तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे याशाळेतील मुलींना तायक्वांदोचे प्रशिक्षण देत आहेत. 

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. 

    जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post