जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत शिऊर शाळेला उपविजेतेपद


जामखेड प्रतिनिधी 
जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जामखेड तालुक्यातील शिऊर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उपविजेतेपद मिळविले आहे. 
क्रीडा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील दा.ह.धाडगे पाटील विद्यालय (त्रिमूर्ती) येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिऊर या शाळेतील मुलींच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व या स्पर्धेतील उपविजेतेपद मिळविले. 

शिऊर शाळेतील, काळे गायत्री गणेश, काळे आर्या हरिश्चंद्र, काळे राधा रघुनाथ, तनपुरे वैष्णवी दादा, देवकाते रानी किरण, काळे आर्या ईश्वर, काळे मोनिका गणेश, निकम सृष्टी अनिल, देवकाते साक्षी नानासाहेब, समुद्र काजल अरुण या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. 

या सर्व खेळाडूंना शिऊर शाळेचे मुख्याध्यापक वांढरे सर, गर्जे सर, शेलार सर, मासाळकर मॅडम
माने मॅडम, काळे मॅडम, सोनवणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. 

या कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, खर्डा बीटचे विस्तार अधिकारी संजय नरवडे, केंद्र प्रमुख सुरेश मोहिते यांनी अभिनंदन केले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post