गटशिक्षणाधिकारी मा. श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी केले वेगळे काम
जामखेड प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी याप्रसंगी मा.श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या प्रेरणेतून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या बचतीच्या पैशातून शाळेस प्रयोगशाळा साहित्य भेट दिले. विज्ञान शिक्षक श्री प्रवीण शिंदे सर यांनी ही संकल्पना मांडली होती व त्यासाठी पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बाबासाहेब कदम हे होते.
आपल्या आयुष्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण संपवून पुढील शिक्षणासाठी सज्ज होणाऱ्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोमाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सातवीच्या मित्रांना निरोप देताना मनोगते व्यक्त केली व त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.
तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भावनिक होत आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व शिक्षकांप्रति असणारी आदर भावना व जिव्हाळा व्यक्त केला.
यावेळी याप्रसंगी मा.श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या प्रेरणेतून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या बचतीच्या पैशातून शाळेस प्रयोगशाळा साहित्य भेट दिले. विज्ञान शिक्षक श्री प्रवीण शिंदे सर यांनी ही संकल्पना मांडली होती व त्यासाठी पुढाकार घेतला होता.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री सुभाष सरोदे सर यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भविष्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
श्री कोथमीरे सर यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास किती गरजेचा आहे याविषयी प्रतिपादन केले.
श्री साळुंखे सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरील आठवणींच्या गोड क्षणांना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची आठवण सर्वांनाच करून दिली.
तर प्रवीण शिंदे सर यांनी 21 व्या शतकातील आव्हाने व भारताचा सुजाण नागरिक घडवण्याच्या दृष्टीने तुम्हा भविष्यातील युवकांची काय जबाबदारी असेल याविषयी भाष्य करून जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे सांगितले.
श्री मधुरकर सर, मुख्याध्यापक, श्री भोसले सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री सरोदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या मुलांनी केले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आपल्या अनोख्या शैलीत श्री रवींद्र इंगोले सर यांनी केले.
तर आभार प्रदर्शन कुमारी दिव्या ढोले हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब कदम,अविनाश चोरगे, अशोक जाधव, शाकीर शेख, रणजीत मस्के या सर्वांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.