संजय कोठारी यांची वेळीच मदत मिळाल्याने अपघातग्रस्तांचे वाचले प्राण

 

जामखेड प्रतिनिधी 
रोडचा अंदाज न आल्याने मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी 

रात्री १२ =०० वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना किरण पवार पाडळी याने फोन केला कोठारी यांनी ताबडतोब रुग्णवाहिका पाठवली आणि मोटरसायकल वरील तीन जखमींना रात्री बाराच्या सुमारास ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे त्यामुळे त्यांचे प्राण वाचलेले आहेत कारण रक्तस्त्राव चालूच होता

महत्त्वाचे म्हणजे जामखेड वरून सेंट्रींग चे काम करून उशिरा मोटरसायकलवर सतीश साळवे वय २७,उमेश कानगुडे वय १९, पप्पू कचरे वय २८ सर्व राहणार पाडळी तालुका जामखेड येथील असून अज्ञात वाहनाने त्यांना धडकून निघून गेला घटनेची माहिती किरण पवार यांनी रात्री उशिरा १२  वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली कोठारी यांनी ताबडतोब आपली रुग्णवाहिका पाठवून जखमींना दवाखान्यात दाखल केले आहेत यापैकी दोन जणांचे पाय मोडले असून तिसऱ्या मुलाला भरपूर लागले आहे तब्येतीची सुधारणा होत आहे या कामी दीपक भोरे आणि तन्वीर शेख , आकाश घागरे यांनी मदत केली 

यावेळी बोलताना किरण पवार म्हणाले संजय काका कोठारी यांना कधीही फोन केला की ते पाच मिनिटात गाडी पाठवून जखमीना दवाखान्यात दाखल करतात खूप मोठी बाब आहे आतापर्यंत त्यांनी हजारो अपघातातील लोकांचे प्राण वाचवले आहे

Post a Comment

Previous Post Next Post